शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, मुंबईत जागावाटपाचा तिढा सुटला; भाजपा-शिंदेसेना किती जागा लढणार?
2
"मुंबईचा महापौर पठाण, शैख, सैयद, अन्सारी का होऊ शकत नाही?"; वारीस पठाण यांचा प्रश्न, संजय राऊतांचंही स्पष्टच उत्तर!
3
भारतीयांना रशियन दारूचे वेड! १० महिन्यांत ५२० टन व्हिस्की, जिन आणि वोडका रिचवली
4
कानातले, मोजे आणि अंडरगारमेंट गायब...; उदयपूर गँगरेपमधील IT मॅनेजर पीडितेची आपबीती
5
मंत्री भरत गोगावलेंचे पुत्र विकास गोगावले २४ दिवसांपासून पोलिसांना सापडेना, महाडमधील प्रकरण काय?
6
पोलिसांवर दगडफेक! 12 महिलांसह 75 जणांना अटक; जयपूरमध्ये मध्यरात्री नेमकं काय झालं?
7
"धुरंधर हा एक भयानक कुत्रा...", राम गोपाल वर्मा यांचं वादग्रस्त ट्वीट, म्हणाले- "गेल्या ५० वर्षांत..."
8
"राहिलेलं आयुष्य राजसाहेबांसोबत" म्हणणाऱ्या पाटलांनी मनसे सोडली; भाजपला लबाड म्हटल्याचा व्हिडीओ व्हायरल
9
भाईंदरनंतर आता ठाण्यात बिबट्या घुसला, नागरिकांमध्ये दहशत, नेमका कुठे आणि कधी दिसला?
10
भाजपाच्या सांगण्यावरून शिवसेना चालणार का?; संतप्त शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांचं पुण्यात आंदोलन
11
भारतातच फिरायला जायचा विचार करताय? 'या' ४ राज्यांत विनापरवाना गेलात तर होईल ५ वर्षांची जेल!
12
₹७६१३ वरुन ₹१५२२ वर आला 'हा' शेअर; अखेर का एका दिवसात ८० टक्क्यांनी स्वस्त झाला स्टॉक?
13
Malegaon Municipal Corporation Election : दोन्ही ठाकरे बंधूंची झाली युती; मालेगाव पालिकेत प्रभाव किती? मनोमिलनानंतर शांतता
14
"ते माझं भवितव्य बरबाद करतील...", 'इंडियन आयडल' जिंकल्यानंतर अभिजीत सावंतने केलेला मोठा गौप्यस्फोट
15
"ड्रग्ज... शिंदे... माजी पोलीस अधिकारी..., राज्याचं राजकारण नशेबाज झालंय!"; राऊतांचा फडणवीसांवर निशाणा
16
पुन्हा राज्यसभेवर संधी मिळेल का? मोदी सरकारमधील सहा मंत्र्यांची 2026 मध्ये ‘अग्निपरीक्षा’
17
अरे हे काय! मुंबईच्या संघात दोन-दोन रोहित; व्हायरल फोटो पाहून चाहते थक्क, हिटमॅनचा 'ड्युप्लिकेट' कोण?
18
सरकारी कर्मचारी दांपत्यांना दिलासा! पती-पत्नीची एकाच शहरात नियुक्ती करण्याचे केंद्राचे निर्देश
19
Malegaon Municipal Corporation Election : मालेगावमध्ये एमआयएम-काँग्रेस युतीचा प्रयोग; वरिष्ठांच्या हालचाली, जागा वाटपाचीही चर्चा
20
Accident : भाड्याने थार घेतली, गर्लफ्रेंडला भेटायला निघाला; समोर कुटुंब दिसताच गाडी पळवू लागला अन्... 
Daily Top 2Weekly Top 5

नगरमध्ये नारायण राणेंविरोधात गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:26 IST

अहमदनगर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह व्यक्तव्य केल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याविरोधात मंगळवारी (दि. २४) नगरमध्ये गुन्हा ...

अहमदनगर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह व्यक्तव्य केल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याविरोधात मंगळवारी (दि. २४) नगरमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी शिवसेनेचे नगरसवेक बाळासाहेब मारुती बोराटे (वय ५१) यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी राणे यांच्या विरोधात कलम ५००, कलम ५०५(२) व कलम १५३ ब प्रमाणे गुन्ह्याची नोंद केली आहे. याबाबत दिलेल्या फिर्यादीत बोरटे यांनी म्हटले आहे की, मी २३ ऑगस्ट रोजी सकाळी माझ्या घरात टीव्ही पाहत असताना, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले. मुख्यमंत्री व शिवसेना पक्षाबाबत बदनामीकारक, द्वेषभाव निर्माण करणारी विधाने करून राणे यांनी समाजामाध्ये तेढ, द्वेषाची भावना निर्माण केली आहे. सदरची बातमी शिवसेनेच्या महापौर रोहिणी शेंडगे, कार्यकर्ते दिलीप सातपुते, भगवानराव फुलसौंदर, संजय शेंडगे, स्मिता आष्टेकर, आशाताई निंबाळकर, विक्रम राठोड, संभाजी कदम, अनिल शिंदे आदींनी पाहिली असल्याचे या फिर्यादीत म्हटले आहे.

------------------

शिवसैनिक आक्रमक, प्रतिमेला मारले जोडे

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह व्यक्तव्याचे नगर शहरातही पडसाद उमटले. मंगळवारी सकाळी शिवसैनिकांनी शहरातील गांधी मैदानातील शहर भाजप कार्यालयासमोर आक्रमक घोषणाबाजी केली. यावेळी शिवसैनिकांनी राणेंच्या प्रतीकात्मक प्रतिमेला जोडे मारून प्रतिमेचे दहन केले. यावेळी शिवसेनेचे बाळासाहेब बोराटे, दिलीप सातपुते, विक्रम राठोड, संभाजी कदम, स्मिता अष्टेकर, अनिल शिंदे, गणेश कवडे, संजय शेंडगे, रोहन ढवण आदी पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. याशिवाय संगमनेर शहर आणि नगर शहरातील माळीवाडा भागातील शौचालयाला राणे यांचे नाव देऊन शिवसैनिकांनी राणे यांचा निषेध केला. शिर्डी, कोपरगाव आदी ठिकाणीही राणे यांच्या प्रतिमेला जोडे मारून आंदोलन केले.

-------

फोटो -२४ आंदोलन