प्रशांत शिवाजी गागरे हे आपल्या कुटुंबासह राहुरी तालुक्यातील तांभेरे येथील दत्त मंदिराजवळ राहत आहेत. त्याची तांभेरे ग्रामपंचायत हद्दीत शेती असून, त्याच्या चुलत भावाशी शेतीच्या बांधावरून वाद आहेत. दि. १२ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजेदरम्यान प्रशांत गागरे हा घरी असताना शेतीचा बांध सरकला या कारणावरून प्रशांतचा चुलत भाऊ राधेश्याम गागरे याने कुऱ्हाड काढून प्रथम कुऱ्हाडीचा दांडा प्रशांतच्या पाठीत मारला. नंतर त्याने कुऱ्हाडीचा दुसरा वार केला. कुऱ्हाडीचा वार वाचविताना प्रशांतच्या तळ हातावर वार झाला. यावेळी प्रशांतचा भाऊ अविनाश याने तातडीने प्रशांतला लोणी येथील प्रवरा हाॅस्पिटल येथे उपचारासाठी दाखल केले.
राहुरी पोलीस ठाण्यात वैद्यकीय अहवाल प्राप्त झाल्याने आरोपी ऋषिकेश राधेश्याम गागरे, संगीता राधेश्याम गागरे यांच्याविरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हनुमंत गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार गायकवाड हे करीत आहेत.