कोपरगाव : घरासमोरील उखांड्याच्या वादातून दोन गटांत हाणामारीची घटना कोपरगाव तालुक्यातील ब्राम्हणगाव येथे रविवारी (दि.१३) सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली.
याप्रकरणी दोनही गटांनी सोमवारी (दि.१४) कोपरगाव पोलिसांत परस्परविरोधी फिर्यादी दाखल केल्या आहेत. बाळू शंकर खैरे (रा.ब्राह्मणगाव़ ता.कोपरगाव )यांच्या फिर्यादीवरून मच्छिंद्र बबन खैरे, सोमनाथ बबन खैरे, बबन शंकर खैरे (तिघे रा. ब्राह्मणगाव, ता.कोपरगाव) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तर सोमनाथ बाळू खैरे (रा.ब्राह्मणगाव, ता. कोपरगाव ) यांच्या फिर्यादीवरून महेंद्र बाळू खैरे, तुळशीराम शंकर खैरे, अनिल खैरे, बाळू शंकर खैरे, अलका बाळू खैरे (पाचही जण रा. ब्राह्मणगाव, ता. कोपरगाव ) यांच्या विरुद्ध कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल अशोक आंधळे करीत आहेत.