शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

पंधरा दिवस आधीच रचला होता मुकुंद वाकडेच्या हत्येचा कट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2020 16:24 IST

श्रीगोंदा तालुक्यातील आढळगाव येथील मुकुंद जयसिंग वाकडे याचा काटा काढण्याचा प्लॅन पंधरा दिवसापूर्वी दत्तात्रय पठाडे व त्याच्या पे्रयसीने रचला होता, अशी धक्कादायक माहिती पोलिसांनी आरोपींच्या घेतलेल्या जबावावरून पुढे आली आहे. 

श्रीगोंदा : तालुक्यातील आढळगाव येथील मुकुंद जयसिंग वाकडे याचा काटा काढण्याचा प्लॅन पंधरा दिवसापूर्वी दत्तात्रय पठाडे व त्याच्या पे्रयसीने रचला होता, अशी धक्कादायक माहिती पोलिसांनी आरोपींच्या घेतलेल्या जबावावरून पुढे आली आहे.  आरोपी दत्तात्रय पठाडे व महिलेचे तीन वर्षांपासून प्रेमप्रकरण सुरू होते. याची मुकुंदला माहिती होती. लॉकडाऊनचा फायदा घेत मयत मुकुंद वाकडे यानेही महिलेला त्रास दिला. त्या महिलेने आपल्या प्रियकरास मुकुंद मला त्रास देत आहे. तू त्याला संपवून टाक. अन्यथा मला जगणे अवघड होईल, असे सांगितले. त्यानंतर दत्तात्रय पठाडे हा मुकुंदवर पाळत ठेवून होता. शनिवारी संध्याकाळी दत्तात्रय पठाडे यास या महिलेने मुकुंदची माहिती दिली. यानंतर दत्तात्रयने डाळिंबाच्या बागेत मुकुंदचा खून केला. खून केल्यानंतर दत्तात्रय पठाडे गावात आला. त्याने आपला मित्र सचिन भाऊसाहेब शिंदे याला डाळिंबाच्या बागेत मृत्यू झाला आहे. आपण मळ्यातून जाऊन येऊ असे सांगितले. त्यानंतर दोघे जण मळ्यात गेले. येथे मुकुंदचे प्रेत आढळले.  अंत्यविधीची तयारी आणि ढोंगीपणा  दत्तात्रय पठाडे याने मुकुंदचे प्रेत पाहून डोळ्याला पाणी आणण्याचे नाटक केले. आढळगावमध्ये आला. एका किराणा दुकानदाराकडून लगबगीने अंत्यसंस्काराचे साहित्य खरेदी केले.  मुकुंदच्या शरिराचे शवविच्छेदन न करता अंत्यसंस्काराची तयारी सुरु केली. पण काही नागरिकांनी त्याला विरोध केला. त्यामुळे या खुनाचे बिंग फुटले. एकलव्य टीमची मदतया खुनाचा तपास करताना पोलिसांना सुरुवातीला मेळ लागत नव्हता. कारण मयताचे मोबाईलवर कोणत्याही स्त्री अथवा पुरुषाबरोबर संवाद झालेला नव्हता. त्यामुळे पोलिसांना पावलांचे ठसे तपासून शोध घेणाºया बांगर्डे येथील एकलव्य टीममधील व्यक्तींनी मोठी मदत केली. त्यामुळे आरोपीस २४ तासाच्या आत बेड्या ठोकण्यास मदत झाली. एकलव्य टीमच्या कामगिरीचे जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंग यांनी कौतुक केले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrigondaश्रीगोंदाCrime Newsगुन्हेगारी