शहरं
Join us  
Trending Stories
1
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
2
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
3
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
4
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
5
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
6
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
7
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
8
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
9
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
10
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
11
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
12
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
13
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
14
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
15
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
16
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
17
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
18
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
19
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

शेवगाव तालुक्यातील शहरटाकळी येथील विलगीकरण कक्षातील महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2020 13:05 IST

शेवगाव तालुक्यातील शहरटाकळी येथील विलगीकरण कक्षातील ६० वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह निघाली आहे. तिचा संपर्कातील त्यांचा मुलगा-सून व दोन नातवंडे अशा चार जणांना रात्री उशीरा तपासणीसाठी नगरच्या सरकारी रुग्णालयात पाठविले आहे, अशी माहिती दहिगावने प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.कैलास कानडे यांनी शुक्रवारी (दि.१ जून) ‘लोकमत’शी बोलताना दिली. 

दहिगावने : शेवगाव तालुक्यातील शहरटाकळी येथील विलगीकरण कक्षातील ६० वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह निघाली आहे. तिचा संपर्कातील त्यांचा मुलगा-सून व दोन नातवंडे अशा चार जणांना रात्री उशीरा तपासणीसाठी नगरच्या सरकारी रुग्णालयात पाठविले आहे, अशी माहिती दहिगावने प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.कैलास कानडे यांनी शुक्रवारी (दि.१ जून) ‘लोकमत’शी बोलताना दिली. 

कोरोनाबाधित असलेली महिला व त्यांच्या कुटुंबाचे मूळ गाव शेवगाव तालुक्यातील मळेगाव आहे. मात्र मुंबई येथून येताना त्यांनी शहरटाकळी येथील पास घेतला आहे. त्या पासवर वरिष्ठ पोलीस अधिका-याचा शिक्का व सही असल्याची माहिती शहरटाकळीचे ग्रामविकास अधिकारी विठ्ठल आव्हाड व तलाठी संदीप आठरे यांनी दिली.      ३० मे रोजी सदर कुटुंब मुंबईहुन शहरटाकळी येथे आल्यानंतर त्यांना अंत्रे येथील शहरटाकळी हायस्कूलमधील विलगीकरण कक्षात ठेवले होते. त्याच दिवशी महिलेच्या पतीला छातीत त्रास जाणवू लागण्यानंतर दोघांना नगर येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले. रविवारी रात्री उशिरा त्यांचे अहवाल आल्यानंतर महिला कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले. वैद्यकीय अधिका-यांनी रविवारी रात्री २ वाजता महिलेसोबत असलेला तिचा मुलगा, सून व दोन नातवंडे यांना सिव्हिल हॉस्पिटल येथे तपासणीसाठी पाठवले.

     शहरटाकळी गाव शंभर टक्के लॉकडाऊन करण्यात येणार असल्याची माहिती गटविकास अधिकारी महेश डोके, नायब तहसीलदार मयूर बेरड यांनी दिली.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरcorona virusकोरोना वायरस बातम्याShevgaonशेवगाव