श्रीगोंदा : पिसोरे खांड शिवारात ८ डिसेंबर रोजी घरफोडी करून १ लाख ३० हजार किंमतीचे सोन्याचे दागिने चोरणाऱ्या उदाशा लालश्या भोसले व अतुल उदाशा भोसले या पिता-पुत्र दरोडेखोरांना श्रीगोंदा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
पोलिस निरीक्षक रामराव ढिकले यांच्या गुप्त खबऱ्या मार्फत पिसोरे खांड येथील इंगळे वस्तीवरील घरफोडी कोळगाव येथील पिता-पुत्राने केली. त्यावर कोंबिंग ऑपरेशन केले. हे पितापुत्र जाळ्यात अडकले. त्याच्याकडून ३० हजार किंमतीचे सोन्याचे दागिने व एक चाकू जप्त केला आहे. या दरोडेखोरांच्या विरोधात तळेगाव दाभाडे, आळेफाटा, बेलवंडी, पारनेर, नगर तालुका, पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल आहेत. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक आण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रामराव ढिकले, सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप तेजनकर, विठ्ठल पाटील, भानुदास नवले, अंकुश ढवळे, प्रकाश मांडगे, किरण बोराडे, दादा टाके, संजय काळे, गोकुळ इंगवले, योगेश सुपेकर यांनी केली.
...
काष्टीत मोटारसायकल चोरास अटक
काष्टीत बापू गव्हाणे या मोटारसायकल चोरास श्रीगोंदा पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून एक लाख किंमतीच्या दोन मोटारसायकली जप्त केल्या आहेत. युनीकाॅन मोटारसायकल चोरली. या गाडीची नगरच्या कोतवाली पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे.