शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

चिमुकल्या मुलाला पित्याने लावलं भीक मागायला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2018 15:24 IST

व्यसनी पित्याने अवघ्या चार वर्षांच्या मुलाला दारू पाजून त्याला भीक मागायला भाग पाडले. ही बाब चाइल्ड लाइन संस्थेतील कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्या निर्दयी बापाच्या तावडीतून मुलाची सुटका करत त्याला बालगृहात भरती करण्यात आले.

अहमदनगर : व्यसनी पित्याने अवघ्या चार वर्षांच्या मुलाला दारू पाजून त्याला भीक मागायला भाग पाडले. ही बाब चाइल्ड लाइन संस्थेतील कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्या निर्दयी बापाच्या तावडीतून मुलाची सुटका करत त्याला बालगृहात भरती करण्यात आले.या प्रकरणी सदर मुलाच्या वडिलाविरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील कोठला बसस्थानक परिसरात १४ जून रोजी एक चार वर्षांचा मुलगा बेशुद्ध अवस्थेत पडला असल्याची माहिती चाइल्ड लाइन संस्थेतील अलीम पठाण यांना मिळाली. पठाण यांच्यासह संस्थेतील प्राची सोनवणे यांनी घटनास्थळी जाऊन त्या मुलाची माहिती घेतली. तेव्हा त्याची व्यथा समोर आली. त्या मुलाचा पिता राजू वैरागर (रा़ पाथर्डी) हा तेथेच होता. पठाण व सोनवणे यांनी माहिती अधीक घेतली तेव्हा राजू वैरागार हा स्वत:च्याच मुलाला नशायुक्त पदार्थ पाजून जबरदस्तीने भीक मागायला लावत असल्याचे समोर आले. पठाण व सोनवणे यांनी मुलास व त्याच्या वडिलांना ताब्यात घेत तोफखाना पोलीस ठाणे येथे घेऊन जात असताना राजू वैरागर मध्येच पळून गेला. त्या मुलाला तोफखाना पोलीस ठाण्यात आणण्यात आले. तेथे मात्र त्याची प्रकृती आणखी खालावल्याने त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. पाच दिवस मुलावर उपचार करण्यात आले. प्रकृती ठिक झाल्यानंतर त्याला येथील बालगृहात दाखल करण्यात आले. त्या मुलाची आई त्याला सोडून गेलेली असून, केवळ वडिलांचाच आधार त्याला होता. मात्र त्याच्या वडिलांनीच त्याला भीक मागण्यास भाग पाडले.  या प्रकरणी अलीम पठाण यांच्या फिर्यादीवरून राजू वैरागर याच्या विरोधात मंगळवारी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar policeअहमदनगर पोलीस