शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

जवळे येथील सिद्धेश्वर ओढ्याच्या पाण्यात उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2018 18:52 IST

पारनेर तालुक्यातील जवळे येथील कुकडी डाव्या कालव्यापासून सिद्धेश्वर ओढ्यातून राजरोस दिवस-रात्र मोठ्या प्रमाणात चोरून वाळूउपसा होत आहे.

जवळे : पारनेर तालुक्यातील जवळे येथील कुकडी डाव्या कालव्यापासून सिद्धेश्वर ओढ्यातून राजरोस दिवस-रात्र मोठ्या प्रमाणात चोरून वाळूउपसा होत आहे. याबाबत महसूल विभाग बघ्याची भूमिका घेत असल्याच्या निषेधार्थ सोमवारी ग्रामस्थांनी ओढ्याजवळ उपोषण सुरू केले आहे. काही काळ ओढ्यातील पाण्यात उभे राहूनच उपोषण करण्यात आले.परिवर्तन चळवळीच्या माध्यमातून रामदास घावटे यांच्या नेतृत्वाखाली ही उपोषण सुरू करण्यात आले आहे. त्यासाठी ओढ्याजवळच मंडप टाकण्यात आला आहे. जवळे गावातील वाळूचोरीचे पंचनामे करून पोलिसांमध्ये गुन्हे दाखल करावेत, गावातील वाळू चोरी पूर्णपणे थांबवावी, वाळूचोरीमुळे सरकारचा बुडालेला महसूल संबंधितांकडून वसूल करावा, या मागण्यांसाठी उपोषण सुरू करण्यात आले आहे. जोपर्यंत कारवाई करण्यात येत नाही, तोपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचा इशारा देण्यात आला आहे. उपोषण काळात गुंडप्रवृत्तीच्या लोकांकडून घावटे यांच्या बाबतीत कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये, म्हणून पोलीस संरक्षण मिळावे, अशी मागणी शरद पवळे यांनी केली आहे. या उपोषणास निघोज येथील दारूबंदी चळवळीचे कार्यकर्ते बबन कवाद, शरद पवळे, भानुदास साळवे, भ्रष्टाचार जनआंदोलनाचे कार्यकर्ते संजय वाघमारे, सचिन नगरे, तुषार औटी, रंजना पठारे, ज्ञानदेव पठारे, महेंद्र पठारे, प्रभाकर घावटे, गंगाधर सालके, बाबाजी गाडीलकर, नामदेव रसाळ, भाऊसाहेब आढाव, मंगेश सालके, संतोष सालके, रमेश सालके यांनी पाठिंबा दिला आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरParnerपारनेर