शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

विविध मागण्यांसाठी संगमनेरमध्ये उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2019 16:26 IST

संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीने बांधलेल्या बेकायदेशीर गाळ्यांची चौकशी व्हावी.

संगमनेर : संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीने बांधलेल्या बेकायदेशीर गाळ्यांची चौकशी व्हावी. औद्योगिक वसाहतीमधील भूखंड हस्तांतरण तसेच शासन निधी अनुदानात झालेली अनियमितता, जलशुध्दीकरण प्रकल्प आणि नदीपात्रात सोडण्यात येत असलेले प्रदूषित पाणी बंद करावे, यासह विविध मागण्यांसाठी संगमनेर शहर आणि तालुक्यातील कार्यकर्ते आज संगमनेर प्रांत कचेरी बाहेर उपोषणाला बसले आहेत.प्रांताधिकारी शशिकांत मंगरूळे यांनी गुरूवारी (८ आॅगस्ट) प्रांतकचेरीत बैठक बोलावली होती. मात्र, बैठकीत कोणताही मार्ग न निघाल्याने कार्यकर्ते उपोषणाला बसले आहेत. शिवसेनेचे माजी तालुकाध्यक्ष कैलास वाकचौरे, संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे शासन नियुक्त संचालक संजय फड, नगरसेविका मेघा भगत, बुवाजी खेमनर, वडझरीचे माजी उपसरपंच शरद गोर्डे, सुनिल सारंबदे आदी उषोषणाला बसले आहेत.गेल्या अनेक वर्षापासून जलशुध्दीकरण प्रकल्पाची मागणी होवूनही सताधारी गटाने दुर्लक्ष केले आहे. संगमनेर औद्योगिक वसाहतीत नवीन उद्योजकांना भूखंड मिळत नाही. असलेल्या भूखंडाच्या हस्तांतरणात झालेली अनियमितता आणि वसाहतीसाठी आलेल्या शासन अनुदानातील अनियमितता याचा चौकशी अहवाल जाहीर करावा. संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीने बांधलेल्या गाळ्यांना नगरपालिका, नगररचना विभाग आणि पणन विभागांची परवानगी नसतानाही त्याची लिलाव प्रक्रीया पूर्ण करण्यात आली. संगमनेर तालुक्यातील वडझरी बुद्रूक ग्रामपंचायतीमध्ये शासन निधीचा गैरवापर झाल्याचे उघड झाले असतानाही संबधित पदाधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही. संगमनेर नगरपालिकेच्या मालकीच्या टपºया बसस्थानकासमोरून गेल्यातरी देखील प्रशासनाने कोणताही गुन्हा दाखल केलेला नाही. साकूर सोसायटीवर २०१० पासून कारवाईची मागणी करत असतानाही सहकार विभागातील अधिकारी हे पदाधिकाऱ्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप बुवाजी खेमनर यांनी केला.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर