पळवे : पारनेर तालुक्यातील येथील यादववाडी येथे महावितरण कंपनीने नवीन रोहित्र उपलब्ध करून दिल्याने वीजपुरवठा सुरळीत सुरू झाला. यामुळे पिण्याच्या पाण्यासह शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत झाली आहे. यादववाडी गावातील सामाजिक कार्यकर्ते सतीश यादव व इतर शेतकऱ्यांनी महावितरण कंपनीला निवेदन देत नवीन रोहित्र बसविण्याची मागणी केली होती. त्यामुळे वाडेगव्हाण महावितरण कंपनीचे उपअभियंता स्वप्नील मापारी यांनी वीज रोहित्र यांची पाहणी करून नवीन वीज रोहित्र तात्काळ बदलले पाहिजे, अशी शिफारस वरिष्ठ स्तरावर केली होती. यावेळी सतीश यादव, मेजर सुरेश यादव, जालिंदर यादव, मेजर संभाजी पाडेकर, प्रकाश यादव, बाळासाहेब यादव, आकाश यादव, अर्जुन यादव आदी उपस्थित होते.
यादववाडीच्या शेतकऱ्यांना मिळाले रोहित्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:49 IST