शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

जामखेडमध्ये शेतकरी, व्यापा-यांनी बंद पाडला जनावरांचा बाजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2019 17:07 IST

बाजार समितीच्या आवारात अवैध रितीने सुरू असलेल्या भूखंडाचे बांधकाम बंद करून ते पाडावे. जनावरे खरेदी-विक्री करणा-या व्यापा-यांना तातडीने परवाने द्यावेत. जनावरांच्या आठवडेबाजारात सुरू असलेले अवैध धंदे तातडीने बंद करावेत, या मागणीसाठी शनिवारी शेतकरी, व्यापा-यांनी जनावरांचा बाजार बंद पाडला. 

जामखेड  : बाजार समितीच्या आवारात अवैध रितीने सुरू असलेल्या भूखंडाचे बांधकाम बंद करून ते पाडावे. जनावरे खरेदी-विक्री करणा-या व्यापा-यांना तातडीने परवाने द्यावेत. जनावरांच्या आठवडेबाजारात सुरू असलेले अवैध धंदे तातडीने बंद करावेत, या मागणीसाठी शनिवारी शेतकरी, व्यापा-यांनी जनावरांचा बाजार बंद पाडला.  जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शनिवारी (दि १४ सप्टेंबर) आठवडेबाजार असतो. मात्र शनिवारी सकाळीच संतप्त झालेल्या व्यापारी व शेतक-यांनी या बाजारातील अवैध सुरू असलेले बांधकाम तातडीने बंद करुन ते पाडण्यात यावे या मागणीसाठी जनावरांचा बाजार बंद पाडला. सकाळी वाहनामध्ये घेऊन येणारे जनावरे व्यापा-यांनी रस्त्यात अडवून माघारी पाठवण्यात आले. त्यामुळे संपूर्ण बैल बाजारात शुकशुकाट होता.  संतप्त व्यापारी व शेतकºयांनी आपला मोर्चा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयासमोर आणला. याठिकाणी धरणे आंदोलन केले. यावेळी सारोळा सरपंच अजय काशीद यांनी बैलाच्या व्यापाºयांंनी परवान्यासाठी अर्ज देऊनही अजून त्यांना परवाने दिले नाही. ते परवाने तातडीने द्यावेत, अशी मागणी केली. बैल बाजारात शौचालय, पाणी व निवाºयाची सोय करावी, अशा मागण्या या आंदोलनादरम्यान केल्या. आंदोलनात रमेश आजबे,  संजय काशिद, व्यापारी फिरोज कुरेशी, पप्पू काशिद, दत्तात्रय जगदाळे, संभाजी काशिद, हरिभाऊ खवळे यांच्यासह तालुक्यातील व्यापारी व शेतकरी सहभागी झाले होते.आश्वासनानंतर आंदोलन मागे सभापती गौतम उतेकर यांनी मोर्चेक-यांच्या भावना जाणून घेतल्या. भूखंडाचे सुरू असलेले बांधकाम तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात येत आहे. बैलांचा व शेळी बाजार कुठेही दुसरीकडे हलविण्यात येणार नाही. जनावरांचा व्यापार करणारे व्यापारी यांना तातडीने परवाने देण्यात येतील. बाजार समितीच्या आवारातील वृक्षतोड तोड होणार नाही. लवकरच शौचालयाची सोय उपलब्ध करून दिली जाईल. तातडीने संचालक मंडळांची बैठक घेऊन पुढील निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर पाच तास सुरू असलेले आंदोलन मागे घेण्यात आले. 

टॅग्स :FarmerशेतकरीAhmednagarअहमदनगर