शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

भाव कोसळल्याने शेतक-यांनी फेकले टोमॅटो रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2017 19:05 IST

टोमॅटोचे भाव अचानक कोसळल्याने संतप्त झालेल्या शेतक-यांनी शनिवारी सकाळी नऊ वाजता बाजार समिती समोरच काही काळ नाशिक-पुणे महामार्ग रोखून धरला. काही शेतक-यांनी रस्त्यावर टोमॅटो फेकत आपला रोष व्यक्त केला.

लोकमत न्यूज नेटवर्कसंगमनेर : बकरी ईदमुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत बहुतांशी लिलाव बंद असल्याने टोमॅटोचे भाव अचानक कोसळल्याने संतप्त झालेल्या शेतक-यांनी शनिवारी सकाळी नऊ वाजता बाजार समिती समोरच काही काळ नाशिक-पुणे महामार्ग रोखून धरला. काही शेतक-यांनी रस्त्यावर टोमॅटो फेकत आपला रोष व्यक्त केला. शनिवारी गावच्या आठवडे बाजाराच्या दिवशी तालुक्यातील शेतक-यांनी मोठ्या प्रमाणात टोमॅटो विक्रीसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीत आणले होते. बकरी ईद असल्याने अनेक व्यापा-यांनी आपले लिलाव बंद ठेवले होते. आवक अधिक झाल्याने टोमॅटोचे भाव ६०० ते ७०० रुपयांवरून २०० ते ३०० रूपये इतका घसरला. कालपर्यंत चांगला भाव मिळत होता, मात्र आज अचानक कमी झालेल्या भावामुळे शेतक-यांनी संत्पत होत बाजार समिती समोरच वाहने आडवी लावत रास्ता रोको सुरू केला. यामुळे काही काळ महामार्गाच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. अचानक भाव कोसळल्याने तालुक्यातील विविध गावातील आलेल्या काही शेतक-यांनी टोमॅटो रस्त्यावर फेकत आपला रोष व्यक्त केला. वातावरण तणावपूर्ण बनल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक थोरात, पोलीस निरीक्षक गोविंद ओमासे, पोलीस उपनिरीक्षक शंकरसिंग रजपूत हे फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. काही वेळातच तहसीलदार साहेबराव सोनवणे हे देखील घटनास्थळी आल्यानंतर प्रशासनाने शेतक-यांची समजूत काढल्यानंतर रास्ता रोको मागे घेण्यात आला.