शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
2
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
3
Bilaspur Train Accident : सीटमध्ये पाय अडकलेला, डोळ्यांसमोर मृतदेहांचा खच...; बिलासपूर अपघाताचं भीषण दृश्य!
4
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...
5
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
6
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
7
Shocking! संतापलेल्या पतीने पत्नीचे नाक कापले, ब्लेडने बोटांवरही वार केले; त्यानंतर जे घडलं...
8
'आम्हालाही दिलासा द्या..,' Vi ला मिळालेल्या दिलास्यानंतर Airtel नं का म्हटलं असं? सरकारकडे जाणार कंपनी
9
वयाच्या तिशीत ‘हे’ ५ आर्थिक नियम शिका! तुम्हाला श्रीमंत होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही
10
Swapna Shastra: स्वप्नात स्वतःचा मृत्यू पाहणे हे शुभ की अशुभ लक्षण? स्वप्नशास्त्र काय सांगते पाहू
11
पंडित नेहरुंच्या शब्दांनी भाषणाची सुरुवात; न्यूयॉर्कचे पहिले मुस्लिम महापौर ममदानींचा व्हिडिओ व्हायरल...
12
"लाडली, लक्ष्मी, बहीण..."; निवडणूक वर्षात महिलांसाठी रोख रकमेचा महापूर; सरकारं घाट्यात! आरबीआयनं आधीच दिलाय मोठा इशारा
13
मिर्झापूरजवळ भीषण अपघात; रेल्वे रुळ ओलांडताना 'कालका मेल'खाली चिरडून ६ भाविकांचा मृत्यू
14
Sonam Raghuvanshi : ना कागद, ना कापड... राजा रघुवंशीच्या हत्येनंतर धूर्त सोनमने कसे पुसले हत्यारावरचे रक्ताचे डाग?
15
"RJD, काँग्रेसने बिहारला गुन्हेगारी, जातीय हिंसाचाराची राजधानी बनवलं", योगींचा जोरदार हल्लाबोल
16
बॉलिवूड अभिनेत्याचे अनेक अभिनेत्रींसोबत शारीरिक संबंध, पत्नीला संशय येताच मागे लावला डिटेक्टिव्ह अन् मग...
17
समृद्धी महामार्गावर १५०० सीसीटीव्ही कॅमेरे; नागपूर ते मुंबईपर्यंत ‘वॉच’
18
SBI ची नोकरी सोडून सुरू केली शेती, आज ७ कोटींच्या हेलिकॉप्टरचा मालक! ५ एकरापासून सुरुवात
19
Banganga Aarti: बाणगंगा महाआरतीसाठी नियमावली कठोर, 'क्यूआर कोड'सह पूर्व-नोंदणी अनिवार्य!

कोपरगावात शेतक-यांनी कांदा लिलाव बंद पाडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2017 18:43 IST

कोपरगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत व्यापा-यांनी भाव पाडल्याचा आरोप करीत शनिवारी संतप्त शेतक-यांनी कांदा लिलाव बंद पाडल्याने एकच ...

कोपरगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत व्यापा-यांनी भाव पाडल्याचा आरोप करीत शनिवारी संतप्त शेतक-यांनी कांदा लिलाव बंद पाडल्याने एकच गोंधळ उडाला.शनिवारी सकाळी अकरा वाजता तालुक्यातील शेतक-यांनी बाजार समितीत मोठ्या प्रमाणावर कांदा विक्रीसाठी आणला. मात्र १ हजार ७०० रुपयांचा भाव काढल्याने शेतकरी व व्यापारी यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. अखेर ज्ञानदेव रोहोम, संजय लोखंडे, जनार्दन रोहोम, विकास भिंगारे, अशोक लोखंडे, हरिभाऊ शिंदे आदी संतप्त शेतक-यांनी २ हजार ५०० चा भाव देण्याची मागणी करीत कांद्याचे लिलाव बंद पाडले. या प्रकाराने एकच गोंधळ उडाला. दरम्यान उपसभापती नानासाहेब गव्हाणे यांनी तातडीने शेतकरी व व्यापा-यांची बैठक घेऊन समजूत काढली. परंतु शेतकरी ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. त्यामुळे एक वाजेपर्यंत कांद्याचे लिलाव सुरू होऊ शकले नाहीत. सभापती मधुकर टेके व सचिव परसराम सिनगर उपस्थित होते.

लिलावात चुकीचे वागणा-यांवर कारवाई केली जाईल. व्यापा-यांनी सुध्दा शेतक-यांना अधिक मोबदला देण्याची काळजी घ्यावी. शेतक-यांनी व्यापा-यांना विनाकारण त्रास देऊ नये. लिलावास गैरहजर ३-४ व्यापा-यांना नोटिसा काढण्यात येतील. चुकीचे वागणा-या शेतक-यांना समज देण्यात येईल.-नानासाहेब गव्हाणे, उपसभापती

कांद्याला येवला-राहात्याप्रमाणे भाव देण्याची शेतक-यांची मागणी होती. त्यावरून शेतकरी व व्यापारी यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. काही शेतकरी जाणीवपूर्वक लिलाव बंद पाडतात, असे व्यापा-यांचे म्हणणे आहे. आजचे भाव सरासरी १ हजार ६०० ते १ हजार ८०० रूपये निघाले होते. लिलावास १५ पैकी १० व्यापारी हजर होते.-परसराम सिनगर, सचिव

ज्याचा माल नाही, त्याने व्यापा-याला शिवीगाळ केली. वास्तवत: ज्याचा माल आहे, त्यानेच आडत्याशी चर्चा करावी. इतरांना बोलण्याचा अधिकार नाही. बाजार समितीने दोषी व्यापा-यांसह शेतक-यांवर कठोर कारवाई करावी. अन्यथा, पुढील लिलाव होणार नाहीत.-अजित लोहाडे, व्यापारी

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर