शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

शेतक-यांना विमा भरपाई मिळावी - राधाकृष्ण विखे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2019 18:44 IST

अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत मुदतीत पीकविमा भरुनही शेतक-यांना या विमा योजनेचा लाभ मिळू शकलेला नाही.

राहाता : अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत मुदतीत पीकविमा भरुनही शेतक-यांना या विमा योजनेचा लाभ मिळू शकलेला नाही. ऐन टंचाईच्या काळात विमा योजनेच्या लाभापासून वंचित राहीलेल्या 8 हजार 462 शेतक-यांना झालेल्या आर्थिक भुर्दडांचे गांभीर्य लक्षात घेऊन या शेतक-यांना विमा भरपाई मिळवून द्यावी अशी मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्याच्या कृषि आयुक्तांकडे केली आहे.कृषि आयुक्त सुहास दिवसे यांना विरोधी पक्षनेते विखे पाटील यांनी आकडेवारीसह पीकविमा योजनेच्या लाभापासून वंचित राहीलेल्या शेतक-यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधले आहे. अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या माध्यमातून 10 हजार 19 कर्जदार आणि 7 हजार 956 बिगर कर्जदार अशा एकूण 17 हजार 975 शेतक-यांनी प्रधानमंत्री पीकविमा योजनेअंतर्गत पुनर्रचीत हवामान आधारित फळपीकविमा योजनेत सहभाग घेवून 7 कोटी 55 लाख 62 हजार रुपयांचा विमा हप्ता भरणा केला होता. मात्र कर्जदार शेतक-यांपैकी फक्त 9 हजार 448 शेतक-यांनाच विमा रक्कम मंजूर झाली. यापैकी 571 शेतकरी भरपाईपासून वंचित राहीले आहेत तर बिगर कर्जदार शेतक-यांपैकी फक्त 65 शेतक-यांना विमा रकमेचा लाभ मिळाला असल्याने एकूण 8 हजार 462 शेतकरी विमा भरपाईपासून वंचित राहीले असल्याचे निवेदनात म्हटले आहे.सर्व शेतकरी विमा भरपाई मिळण्यासाठी पात्र असताना त्यांना लाभापासून वंचित ठेवने अयोग्य आहे याबाबत आपण गांभियार्ने लक्ष घालून शेतक-यांना विमा भरपाई रक्कम मिळवून द्यावी आणि दिलासा द्यावा अशी मागणी विखे पाटील यांनी केली आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRadhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटील