शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

शेवगाव तालुक्यातील शेतक-यांना बोंडअळीच्या नुकसानाची ९ कोटीची रक्कम प्राप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 17:39 IST

बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे कपाशीच्या उत्पन्नाला मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसलेल्या शेवगाव तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मंजूर अनुदानाच्या रक्कमेपैकी ८ कोटी ७५ लाख ३२ हजार रुपयांची रक्कम प्राप्त झाल्याची माहिती तहसील कार्यालयातील टंचाई शाखेतून देण्यात आली.

शेवगाव : बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे कपाशीच्या उत्पन्नाला मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसलेल्या शेवगाव तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मंजूर अनुदानाच्या रक्कमेपैकी ८ कोटी ७५ लाख ३२ हजार रुपयांची रक्कम प्राप्त झाल्याची माहिती तहसील कार्यालयातील टंचाई शाखेतून देण्यात आली.गेल्या काही वर्षात कापूस उत्पादनात तालुक्याने जिल्ह्यात आघाडी घेतली आहे. मागील वर्षीच्या खरीप हंगामात तालुक्यात विक्रमी ५० हजार हेक्टर क्षेत्रात कपाशीची लागवड झाली. गेल्या वर्षीच्या पावसाळ्यात तालुक्यात ६३२ मि.मी. वार्षिक सरासरी प्रर्जन्यमानाच्या ११२ टक्के पावसाची नोंद झाली, मात्र बोंडअळीच्या उद्भवलेल्या संकटामुळे कापूस उत्पादनास मोठ्या प्रमाणात फटका बसून कापूस उत्पादक शेतकºयांचे शेतीचे अर्थकारण कोलमडले आहे.शेतकºयांच्या नुकसानीचे पंचनामे तालुका कृषी कार्यालयाकडून करण्यात येऊन तालुक्यातील ११२ गावातील ५७ हजार ५०५ शेतकºयांचे जवळपास ४७ हजार १९२ हेक्टर क्षेत्रातील कपाशीचे पीक बाधीत झाल्याचा व तालुक्यासाठी ३२ कोटी ९ लाख रुपये अनुदानाच्या रक्कमेचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला. शासनाने बोंडअळीच्या नुकसानीचे अनुदान तीन टप्प्यात संबंधित शेतकºयांना अदा करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार शेवगाव तालुक्यासाठी ८ कोटी ७५ लाख रुपयाची रक्कम उपलब्ध झाली असून संबंधित कापूस उत्पादक शेतक-यांच्या बँक खात्यावर अनुदानाची ही रक्कम तातडीने वर्ग करण्यात येणार असल्याचे तहसीलदार दीपक पाटील यांनी सांगितले.शेतक-यांच्या मागणीची दखलकापूस उत्पादक शेतक-यांना बोंडअळीच्या प्रादुभार्वाच्या अनुदान प्रक्रियेत जिल्ह्यात सर्वात जास्त कापसाची लागवड असलेल्या शेवगाव तालुक्याचा समावेश नसल्याची कापूस उत्पादक शेतकºयांच्या चर्चेची दखल घेऊन आमदार मोनिका राजळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन बोंडअळीच्या नुकसानीच्या अनुदानात शेवगाव तालुक्याचा प्राधान्याने समावेश करण्याची मागणी केली. त्यानुसार शेवगाव तालुक्यासाठी ३२ कोटी रुपयांची रक्कम मंजूर झाली. यापैकी ८ कोटी ७५ लाख रुपये उपलब्ध झाली.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShevgaonशेवगाव