शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री पदापेक्षा शेतक-यांचे प्रश्न महत्वाचे : उध्दव ठाकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2019 17:34 IST

मुख्यमंत्री कोणाचा होणार ? हा प्रश्न माझ्यासाठी गौण आहे. शेतक-यांचे प्रश्न सोडविण्याला आपले प्राधान्य आहे.

श्रीरामपूर : मुख्यमंत्री कोणाचा होणार ? हा प्रश्न माझ्यासाठी गौण आहे. शेतक-यांचे प्रश्न सोडविण्याला आपले प्राधान्य आहे. कारण शेतक-यांच्या मनातील चीड उफाळून आल्यास सत्तेची आसने खाक होतील, असा इशारा शिवसेना प्रक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला.पीक विमा केंद्राच्या उदघाटनासाठी ठाकरे हे श्रीरामपूरला आले होते. त्यावेळी ते बोलत होते.ठाकरे म्हणाले, कर्जमाफी व पीक विम्याचा लाभ किती शेतकऱ्यांना मिळाला. यावर ठाकरे यांनी उपस्थितांना हात उंचविण्याचे आवाहन केले. मात्र बोटावर मोजण्याइतकेच हात वर आले. त्यावर शेतकºयांना न्याय मिळवून देण्याची शिवसेनेची भूमिका आहे. तालुक्यात प्रत्येक ठिकाणी पीक विमा केंद्र सुरू करा. शिवसेना पदाधिकाºयांनी घरोघरी जाऊन त्याबाबत शेतकºयांना माहिती द्या. शिवसेनेची शेतक-यांच्या प्रश्नावर नेहमीच लढण्याची भूमिका राहिली. पुणतांबे येथील शेतक-यांनी संपावेळी भेट घेतली असता मी विनाअट पाठिंबा दिला. इतर पक्षातील नेते आंदोलनापासून सावध भूमिका बाळगून होते याकडेही त्यांनी लक्ष वेधले. अन्नदाता सुखी राहिला पाहिजे. त्याचा बळी देण्याचे पाप आपण कदापी करणार नाही. शिवसेनेची ताकद ही तुम्ही आहात. तुमच्या हक्काच्या आड कोण येतो ते पाहतो, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. शिवसेना खासदार लोखंडे यांना सलग दुसºयांदा विजयी केल्याने मी येथील मतदारांच्या ऋणी आहे. आता पक्षाचे खासदार, आमदार यांनी जनतेच्या दारापर्यंत जायला पाहिजे. ज्यांनी सत्ता दिली त्यांचे अश्रू पुसायला जा. सरकारच्या योजना गरिबांपर्यंत जातात की नाही हे लोकप्रतिधिंनी पहायला हवेएकनाथ शिंदे म्हणाले, शिवसेनेने सत्तेत राहूनही कधीही शेतकºयांच्या प्रश्नावर तडजोड केली नाही. शेतकºयांना पूर्ण कर्जमाफी याला आमची प्राथमिकता होती. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांनी त्याकरिता संपूर्ण राज्याचा झंझावती दौरा केला. यापुढेही आपला संघर्ष सुरूच राहील.यावेळी मंत्री एकनाथ शिंदे, खासदार सदाशिव लोखंडे, आमदार सुनील शिंदे, मिलिंद नार्वेकर, संजय घाडी, संपर्क प्रमुख आमदार नरेंद्र दराडे, भाऊ कोरेगावकर, माजी आमदार अनिल राठोड, जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे, राजेंद्र झावरे, डॉ.महेश क्षीरसागर, विजय काळे, सभापती दीपक पटारे, डॉ.चेतन लोखंडे, सचिन बडधे, राजेंद्र देवकर, निखिल पवार, संभाजी कºहाड, दादासाहेब कोकणे, गिरीधर आसने, भाऊसाहेब बांद्रे, बाबासाहेब चिडे, संकेत संचेती आदी उपस्थित होते.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस