शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांनी अडविले महामार्ग; रस्त्यावर ओतले दूध, भाजीपाला

By admin | Updated: June 4, 2017 15:46 IST

शेतकरी संपाला पाठिंबा देण्यासाठी नगर जिल्ह्यातून जाणारे महामार्ग रविवारी ठिकठिकाणी अडविण्यात आले़

आॅनलाईन लोकमतअहमदनगर, दि़ ४ - शेतकरी संपाला पाठिंबा देण्यासाठी नगर जिल्ह्यातून जाणारे महामार्ग रविवारी ठिकठिकाणी अडविण्यात आले़ त्यामुळे काही काळ महामार्ग ठप्प झाले होते़ दरम्यान पारनेर तालुक्यातील बेलवंडी फाट्यावर आंदोलक व राज्य राखीव दलाच्या जवानांमध्ये शाब्दिक चकमक झाली़ त्यामुळे वातावरणात तणाव निर्माण झाला होता़नगर-सोलापूर महामार्गावर मिरजगाव येथील क्रांती चौकात संपकरी शेतकऱ्यांनी सुमारे तासभर रास्ता रोको आंदोलन केले़ शेतकऱ्यांनी रस्त्यावर दूध, भाजीपाला रस्त्यावर ओतून सरकारचा निषेध केला.संपूर्ण कर्जमाफी द्या, शेतकऱ्यांना पेशन्स योजना लागू करा, वीजबील माफ करा, शेतीमालाला हमीभाव द्या, स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी करा, अशा विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी सुमारे तासभर राज्यमार्ग रोखला. जिल्हा परिषद सदस्य गुलाब तनपुरे म्हणाले, राज्यसरकारने तातडीने शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करून संपूर्ण कर्जमाफी दिल्याशिवाय शेतकरी आंदोलन मागे घेणार नाहीत़ यावेळी उपसरपंच अमृत लिंगडे, उपसभापती प्रशांत बुध्दिवंत, ग्रामपंचायत सदस्य डॉ.पंढरीनाथ गोरे, शेतकरी नेते संजय पवार, राजेंद्र गोरे, डॉ. श्रीराम धस, उध्दव म्हस्के यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. मंगळवारी मिरजगाव बंदमंगळवारी संपाला पाठिंबा म्हणून मिरजगाव शहर बंद ठेवण्यात येणार आहे़ परिसरात अठरा गावातील शेतकरी नगर-सोलापूर राज्यमार्गावर मिरजगाव येथील क्रांती चौकात पुन्हा रास्ता रोको आंदोलन करणार आहेत़थेरगाव येथे महामार्गावर ओतले दूधघुमरी येथील शेतकऱ्यांनी थेरगाव येथे नगर-सोलापूर राज्यमार्ग अडवून शेतकरी संप फोडणाऱ्या भाजप सरकारचा निषेध केला़ तसेच रस्त्यावर दूध ओतून सरकारविरोधी जोरदार घोषणाबाजी केली़ घोगरगाव येथील रविवारचा आठवडे बाजार सुरु होता़ मात्र विक्रेत्यांची संख्या अत्यंत कमी होती़ जवळेत ओतले दूधपारनेर तालुक्यातील जवळे येथील साईकृपा डेअरीसमोर शेतकऱ्यांनी दूध ओतून भाजप सरकारचा निषेध नोंदविला़ तसेच जोपर्यंत शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत दूध डेअरीला विकणार नाही, असा पवित्रा घेतला़ यावेळी डॉ़ दत्तात्रय खोसे, राजेंद्र लोखंडे, संतोष सालके, अविनाश सालके, विलास बरशिले, सर्जेराव बढे, बाबाजी गाडीलकर, रामदास घावटे आदी उपस्थित होते़जातेगाव फाट्यावर पुणे महामार्ग अडविलापारेनरग तालुक्यातील गटेवाडी येथील नवनाथ महाराज गट यांच्या नेतृत्वाखाली जातेगाव फाटा येथे नगर-पुणे महामार्ग अडविण्यात आला़ आंदोलकांनी महामार्गावर दूध ओतून सरकारचा निषेध केला़ यावेळी संतोष ठाणगे, गोरख गट, विलास ठाणगे, राजेंद्र गट, भिवसेन गट, किरण गट, भगवान गट, बंटी गट, अनिल पवार, अनिल गट, सुरज गट, संदीप गट यांच्यासह ग्रामस्थांनी सहभाग घेतला़आंदोलक-पोलिसांमध्ये शाब्दिक चकमकशेतकरी संपाला पाठींबा देण्यासाठी पारनेर तालुक्यातील वाडेगव्हाण, पाडळी रांजणगाव, नारायणगव्हाण, कुरूंद, कोहोकडी, राळेगण थेरपाळ, मावळेवाडी येथील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन बेलवंडी फाट्यावर रविवारी सकाळी सुमारे दीड तास पाडळी रांजणगावचे उपसरपंच विक्रमसिंह कळमकर यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन केले़ रस्ता बंद झाल्यानंतर पोलिसांनी राज्य राखीव दलाची तुकडी पाचारण केली. यावेळी दलाने आंदोलनकर्त्यांना घेराव घालून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला होता़ त्यावेळी आंदोलक व पोलिसांमध्ये शाब्दीक चकमक झाली़ यावेळी दिपक खंदारे,जालींदर शेळके आदींसह शेतकरी उपस्थित होते़लोणीव्यंकनाथमध्ये दहा जणांवर गुन्हेश्रीगोंदा तालुक्यातील लोणीव्यंकनाथ येथील शेतकऱ्यांनी रास्तारोको आंदोलन करुन सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली़ रास्ता रोको आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलिसांना आंदोलकांनी घोषणाबाजी करीत घेराव घातला़ त्यामुळे पोलिसांनी दहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे़ पाथर्डीत रास्ता रोकोशेतकरी क्रांती संघटनेच्यावतीने पाथर्डी शहरातील नाईक चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले़ यावेळी आंदोलकांनी रस्त्यावर दूध ओतून सरकारचा निषेध केला़ रास्ता रोको आंदोलनामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती़ सोमवारी पाथर्डी बंद ठेवण्यात येणार आहे़