अकोले : तालुक्यातील कुंभेफळ येथील पंढरीनाथ संतू पांडे या ६५ वर्षीय शेतक-याने आजारपणास कंटाळून आपल्या शेतात झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजता ही बाब लक्षात आली. पंढरीनाथ पांडे गेल्या अनेक दिवसापासून आजारी होते. या आजारपणास कंटाळून त्यांनी आत्महत्या केली, अशी चर्चा आहे. या घटनेची अकोले पोलिसात आकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. अधिक तपास पोलीस कॉन्स्टेबल संदीप पांडे करीत आहे. मयत पंढरीनाथ पांडे यांच्या पाठी मागे दोन मुले, दोन मुली, सुना नातवंडे असा परिवार आहे.
आजारपणास कंटाळून गळफास घेऊन शेतक-याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2020 15:54 IST