शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

उत्तरप्रदेशातील १५१९ मजुरांना निरोप; साईनगरीतून चौथी रेल्वे रवाना 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2020 15:33 IST

रोजगारासाठी जिल्ह्यात विसावलेल्या राहाता, संगमनेर व कोपरगाव तालुक्यातील १५१९ मजुरांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घरची वाट धरली. या मजुरांना घेवून साईनगरीतून चौथी रेल्वे शुक्रवारी दुपारी उत्तरप्रदेशला रवाना झाली. 

शिर्डी : रोजगारासाठी जिल्ह्यात विसावलेल्या राहाता, संगमनेर व कोपरगाव तालुक्यातील १५१९ मजुरांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घरची वाट धरली. या मजुरांना घेवून साईनगरीतून चौथी रेल्वे शुक्रवारी दुपारी उत्तरप्रदेशला रवाना झाली. या मजुरांचा घरी परतण्याचा खर्च राज्य सरकारने केला आहे. यासाठी ९ लाख ४७ हजार ७०० रुपये खर्च आला आहे. भविष्याबाबत अनिश्चीतता असली तरी घराच्या ओढीने व त्यासाठी राज्य सरकार व प्रशासनाने घेतलेल्या अथक परिश्रमाबद्दल या मजुरांनी शिर्डी सोडण्यापूर्वी ऋतज्ञता व्यक्त केली. साईनगरीतून उत्तरप्रदेशला जाणारी ही चौथी रेल्वे आहे. आतापर्यंत ५७३१ मजुरांना उत्तरप्रदेशात स्वगृही पाठविण्यात आले आहे. तालुका पातळीवरून एवढ्या संख्येने मजूर स्वराज्यात पाठवणारा राहाता एकमेव तालुका आहे. रेल्वे चालक व गार्डचा यावेळी तहसीलदार हिरे यांनी सत्कार केला.आपल्या श्रमातून येथील विकासात हातभार लावणाºया या मजुरांना रेल्वे स्थानकावर प्रशासनाने निरोप दिला. यावेळी प्रांताधिकारी गोविंद शिंदे, संगमनेरचे प्रांताधिकारी शशिकांत मंगळुरे, पोलीस उपअधिक्षक सोमनाथ वाकचौरे, राहाता तहसिलदार कुंदन हिरे, संगमनेर तहसिलदार अमोल निकम, कोपरगावचे तहसिलदार योगेश चंद्रे, गटविकास अधिकारी समर्थ शेवाळे, शिर्डी नगरपंचायतचे मुख्याधिकारी सतिष दिघे, कोपरगावचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, नायब तहसिलदार सचिन म्हस्के, देसले, शिक्षणाधिकारी ज्ञानेश्वर वाकचौरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक गंधाले, रेल्वेचे स्थानक प्रमुख बी़एस़ प्रसाद, पोलीस निरीक्षक रामजी मीना उपस्थीत होते. मजुरांना स्वगृही पाठविण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या मार्गदर्शनाखाली नियंत्रण कक्ष प्रमुख उर्मिला पाटील, संदीप नचित, वैशाली आव्हाड, चंद्रशेखर शितोळे आदींनी पाठपुरावा केला. संस्थानने दिली अन्नाची पाकिटेमजुरांना संस्थानचे सीईओ अरूण डोंगरे यांच्या आदेशानुसार प्रसादालय प्रमुख विष्णू थोरात यांनी प्रसादालय कर्मचा-यांमार्फत अन्नाची पाकीटे दिली. परिवहन महामंडळाने या कामगारांची संगमनेर व कोपरगाववरून शिर्डीला आणण्यासाठी मोफत व्यवस्था केली. रेल्वेत १५१९ मजुरांचा समावेश होता. या मजुरांना उत्तरप्रदेशातील उन्नाव, सीतापुर व बस्ती येथे सोडण्यात येईल. 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरcorona virusकोरोना वायरस बातम्याshirdiशिर्डीLabourकामगार