बोधेगाव : केंद्र सरकारच्या राष्ट्रीय रूरबन योजनेत शेवगाव तालुक्यातील बोधेगावचा समावेश झालेला आहे. या योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात प्रशासकीय मंजुरी मिळालेल्या कामांचे नुकतेच भूमिपूजन करण्यात आले. जवळपास तीन कोटींच्या विकासकामातून गावाचा चेहरामोहरा बदलणार आहे.
केंद्राच्या राष्ट्रीय रूरबन मिशन या महत्त्वाकांक्षी योजनेत बोधेगाव, हातगाव, सोनविहीर या तीन गावांचा माजी खासदार दिलीप गांधी यांच्या कार्यकाळात समावेश झाला. केंद्रस्तरावर खा. डॉ. सुजय विखे यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला. त्यानुसार योजनेतील गावसमूहासाठी प्राप्त तरतुदीनुसार मंजूर डीपीआर मधील कामांना ऑगस्ट २०२० मध्ये प्रशासकीय मंजुरी मिळाली. यामध्ये बोधेगावतील बंदिस्त गटारी ३५.२३ लाख, अंतर्गत सिमेंट काँक्रिटीकरण रस्ते ५२.२५ लाख, बोधेगाव ते डोईफोडे वस्ती (हातगाव) डांबरीकरण ४९.९२ लाख व पाणीपुरवठा पाईपलाईन १ कोटी ५४ लाख अशा एकूण जवळपास २.९१ कोटींच्या विकासकामांचा समावेश आहे. यातील ११ फेब्रुवारी २०२१ रोजी कार्यारंभ आदेश मिळालेल्या बंदिस्त गटारी, सिमेंट रस्ते व डांबरीकरण रस्त्याचे नुकतेच उपसरपंच नितीन काकडे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.
यावेळी सरपंच सुभाष पवळे, मनोहर घोरतळे, मधुकर खोले, कुंडलिक घोरतळे, भाऊसाहेब घोरतळे, संदिपान घोरतळे, के .टी.वाघमारे, अहमद सय्यद, दादू भोंगळे, अण्णासाहेब घोरतळे, विश्वनाथ कुढेकर, राजू मोरे, शिवनाथ बोराटे, भरत गोरे, जयदीप घोरतळे, अंकुश गर्जे, अशोक खोले, अरुण घोरतळे, संजय पोटभरे, भगवान शिंदे, बबन कुरेशी, कृष्णा काशिद, बाळू परदेशी, गुड्डू घोरतळे आदींसह ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.
---
०४ बोधेगाव
बोधेगाव येथील रस्ता काँक्रिटीकरणाचे भूमिपूजन करताना उपसरपंच नितीन काकडे, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ.