शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

मूलभूत विकास कामांसाठी मुदतवाढ : दिलीप गांधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2018 15:46 IST

महापालिकेच्या क्षेत्रात करावयाच्या मूलभूत विकास कामे पूर्ण करण्याची मुदत यापूर्वी जून-२०१८ अशी होती. खा. दिलीप गांधी यांनी थेट मुख्यमंत्री आणि नगरविकास खात्याच्या सचिवांची मुंबईत भेट घेतली. खा. गांधी यांच्या मागणीप्रमाणे विकास कामे पूर्ण करण्यासाठी डिसेंबर-२०१८ अखेरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

अहमदनगर : महापालिकेच्या क्षेत्रात करावयाच्या मूलभूत विकास कामे पूर्ण करण्याची मुदत यापूर्वी जून-२०१८ अशी होती. खा. दिलीप गांधी यांनी थेट मुख्यमंत्री आणि नगरविकास खात्याच्या सचिवांची मुंबईत भेट घेतली. खा. गांधी यांच्या मागणीप्रमाणे विकास कामे पूर्ण करण्यासाठी डिसेंबर-२०१८ अखेरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.शासनाकडून महानगरपालिकेस मूलभूत सोयी सुविधांच्या विकास योजनेअंतर्गत तीन कोटी मंजूर केले होते. सदर निधीच्या कामांचा प्रस्ताव जिल्हास्तरीय समितीपुढे प्रशासकीय मान्यतेसाठी सादर करण्यात आला होता. त्रिसदस्यीय समितीच्या बैठकीत या कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली होती. त्यानुसार सदर कामांच्या निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. मात्र ही कामे पूर्ण करण्याचा कालावधी जून २०१८ अखेर होता. या कामांसाठी प्रथम ई-निविदा प्रसिद्ध केल्यानंतर निविदाधारकांकडून पुरेशा प्रमाणात प्रतिसाद मिळाला नाही. विकास कामांना मुदतवाढ दिल्याने मोठा कालापव्यय झालेला आहे. निविदा स्वीकृतीनंतर ठेकेदारांकडून सुरक्षा रक्कम भरून घेणे, करारनामा करणे, कार्यारंभ आदेश देणे, प्रत्यक्षात कामे पूर्ण करून ठेकेदारास देयके अदा करणे या सर्व बाबी लक्षात घेता सदरची कामे जून २०१८ पर्यंत पूर्ण होणार नसल्याचे खा. गांधी यांनी नगरविकास खात्याच्या सचिवांना निदर्शनास आणले. त्यामुळे मुदतवाढ आवश्यक असल्याचे लक्षात आणून दिले.महानगरपालिकेची मूलभूत सोयी सुविधा योजनेतील कामे काही तांत्रिक अडचणींमुळे जून २०१८ मध्ये पूर्ण होत नसल्याने सदरच्या कामांना डिसेंबर २०१८ अखेर मुदतवाढ मिळावी अशी मागणी भाजपाचे मनपा गटनेते सुवेंद्र गांधी, नगरसेवक महेश तवले, नगरसेविका मालनताई ढोणे, नगरसेविका मनीषाताई बारस्कर यांनी खासदार दिलीप गांधी यांच्याकडे केली होती. यामुळे खासदार दिलीप गांधी यांनी नगर विकास खात्याच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांची शुक्रवारी मंत्रालयात भेट घेतली. काही प्रशासकीय तांत्रिक अडचणींमुळे कामे अपूर्ण राहिल्याने निधी अखर्चित राहिला तर नागरिकांसाठीची मूलभूत योजनेची कामे पूर्ण होणार नाहीत ही बाब प्रधान सचिवांच्या लक्षात आल्याने ही मुदतवाढ मिळाल्याचे खा. गांधी यांनी पत्रकात म्हटले आहे. याबाबत कक्ष अधिकारी सु. द. धोंडे यांनी महापालिकेस कळविले असल्याचेही पत्रकात म्हटले आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरDilip Gandhiखा. दिलीप गांधी