शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करा-वैभव पिचड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2019 17:53 IST

आदिवासी आरक्षणाबाबत आमचे धोरण काल जे होते ते आजही आहे. राष्ट्रवादीमध्ये गेलेल्यांनी आदिवासी आरक्षणाबाबतची त्यांच्या पक्षाची भूमिका जाहीर करावी, असे आवाहन महायुतीचे उमेदवार वैभव पिचड यांनी विरोधकांना केले.

राजूर : आदिवासी आरक्षणाबाबत आमचे धोरण काल जे होते ते आजही आहे. राष्ट्रवादीमध्ये गेलेल्यांनी आदिवासी आरक्षणाबाबतची त्यांच्या पक्षाची भूमिका जाहीर करावी, असे आवाहन महायुतीचे उमेदवार वैभव पिचड यांनी विरोधकांना केले.बाजारपेठ चौकात सभेचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी आर. पी. आयचे नेते भाई पवार होते. यावेळी पिचड बोलत होते. माजीमंत्री मधुकरराव पिचड, भाजपा तालुकाध्यक्ष सीताराम भांगरे, गटनेते जालिंदर वाकचौरे, मधुकर नवले, सरपंच हेमलता पिचड, शिवाजी धुमाळ, माजी सभापती बाळासाहेब देशमुख, सेनेचे तालुकाध्यक्ष मच्छिंद्र धुमाळ, महेश नवले, गणपत देशमुख, गोकुळ कानकाटे, संतोष बनसोडे, विजय लहामगे, बाळासाहेब लहामगे, काशिनाथ साबळे, सुरेश भांगरे, आयुब तांबोळी उपस्थित होते.वैभव पिचड म्हणाले, आदिवासी समाजाच्या हक्कासाठी वडिलांनी आयुष्यभर संघर्ष केला. घटनेने दिलेल्या आरक्षणाला त्यांनी धक्का लागू दिला नाही. आम्ही आदिवासींच्या आरक्षणाला धक्का लावणार नाही, असा शब्द मुख्यमंत्र्यांकडून घेतला आहे. चाळीस वर्षात काय केले म्हणणाºयांनी आपल्या भागात झालेले रस्ते, छोटी धरणे व इतर कामे कोणी केली? तालुक्यात झालेली धरणे, तालुक्यात झालेली पाटपाण्याची कामे पाहावी. ही सर्व कामे झाल्यामुळे कष्टकरी आज येथील बाजारपेठेत ताठ मानेने उभा आहे. महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी पश्चिमेकडे वाहून जाणारे पाणी पूर्वेकडे वळवणे. प्रत्येक गोरगरीब माणसाला घर असावे यासाठी घरकुल योजना, शेवटच्या माणसांपर्यत विकास पोहचवण्यासाठी डी. बी. टी. योजना अशा विविध योजना राबविल्या. भास्कर एलमामे यांनी सूत्रसंचालन केले तर आरपीआयचे तालुकाध्यक्ष गौतम पवार यांनी आभार मानले.यावेळी माजी मंत्री मधुकर पिचड म्हणाले, मी तुमच्यासाठी आयुष्य घातले. आता मी भारतीय जनता पार्टीत जाण्याच्या घेतलेल्या निर्णयाला तुम्ही साथ द्या.

टॅग्स :PoliticsराजकारणMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019