शहरं
Join us  
Trending Stories
1
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
2
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
3
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
4
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
5
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
6
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
7
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
8
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
9
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
10
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
11
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
12
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
13
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
14
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
15
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
16
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!
17
महिला अधिकारी तुरुंगात गुंडाशी फोनवर अश्लील बोलायची, पत्रेही सापडली; धक्कादायक माहिती उघड
18
विधानसभेच्या नो पार्किंगमध्ये उभी होती मंत्र्यांची कार, वाहतूक पोलिसांनी क्रेन आणली आणि...
19
बेपत्ता अर्चनाला शोधण्यासाठी पोलिसांना नवा प्लॅन; ८ दिवसांपासून ती गायब, ६ टीम अलर्ट
20
'तारीख-वार तुम्ही ठरवा, मी यायला तयार...'; बागेश्वर बाबाने स्वीकारलं अखिलेश यादवंचे 'चॅलेंज'

नगरमधील भाजपचे विस्तारक थेट मुख्यमंत्री वॉर रुमशी कनेक्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2017 12:28 IST

भाजपने नगर जिल्ह्यात विस्तारकांच्या नियुक्त्या केल्यानंतर बुथरचना स्ट्राँग करण्यावर लक्ष केंद्रीत केले आहे. गेल्या चार महिन्यांमध्ये भाजपच्या विस्तारकांनी तालुक्यांमध्ये बुथ तयार करून तब्बल ८० हजार कार्यकर्ते जोडले आहेत.

अहमदनगर : भाजपने जिल्ह्यात विस्तारकांच्या नियुक्त्या केल्यानंतर बुथरचना स्ट्राँग करण्यावर लक्ष केंद्रीत केले आहे. गेल्या चार महिन्यांमध्ये भाजपच्या विस्तारकांनी तालुक्यांमध्ये बुथ तयार करून तब्बल ८० हजार कार्यकर्ते जोडले आहेत. आगामी निवडणुकांच्यादृष्टीने पक्ष संघटना मजबूत करण्यावर पक्षाने भर दिला आहे.  मुख्यमंत्री वॉर रुममधून विस्तारकांशी नियमित संपर्क केला जात आहे.केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता असली तरी कर्जमाफी, जीएसटी या गोष्टींमुळे सरकारबाबत सामान्य नागरिकांमध्ये रोष आहे. त्याची दखल पक्ष पातळीवरही घेतली गेली आहे. चार-पाच महिन्यांपूर्वी पक्षाने संघटना मजबूत करण्यासाठी जिल्ह्यात प्रत्येक विधानसभेला एका विस्तारकाची नियुक्ती केली आहे. पक्षातील जुना-जाणत्या कार्यकर्त्याला विस्तारक म्हणून जबाबदारी दिली आहे. जिल्ह्यात बारा विधानसभा मतदार संघात बारा विस्तारक नियुक्त असून तेवढेच पालक आहेत. विस्तारक मतदारसंघात आल्यानंतर पालकांनी त्यांची संपर्क, निवास, भोजनाची व्यवस्था करायची आहे. प्रशिक्षित विस्तारकांना पक्षाने मोबाईल दिले आहेत. हे मोबाईल थेट राज्य आणि राष्ट्रीय पक्ष कार्यालयाशी जोडलेले आहेत. मुख्यमंत्री वॉर रुममधून विस्तारकांशी नियमित संपर्क केला जात आहे. यामुळे विस्तारक नेमके कुठे काम करतात, याचे ट्रॅकिंग होते. तशी जीपीएस सिस्टिम मोबाईलमध्ये आहे.एका विस्तारकाने मतदारसंघात बुथ रचना करायची आहे. एका बुथमध्ये ३० कार्यकर्ते जोडले आहेत. त्यांचे नाव,पत्ता, मोबाईल क्रमाकांसह मोबाईल अ‍ॅपमध्ये माहिती साठविण्यात आली आहे. एखाद्या बुथवरील कार्यकर्त्याशी थेट मुख्यमंत्री वॉर रुममधूनही संपर्क साधला जावू शकतो. जिल्ह्यात ३ हजार ५९९ बुथपैकी २ हजार ६६४ बुथ रचना पूर्ण झाली आहे. या माध्यमातून ७९ हजार ९२० कार्यकर्ते थेट जोडले आहेत. राहिलेली बुथरचना महिनाभरात पूर्ण होणार आहे.

विस्तारकांचा साधेपणा

‘संघ प्रचारका’प्रमाणेच विस्तारकांच्या कामाची पद्धत आहे. कार्यकर्त्यांच्या घरी भोजन घेणे, दुचाकीवरून फिरणे, साधे कपडे वापरणे अशा सूचनाच विस्तारकांना आहेत. रामभाऊ म्हाळगी प्रतिष्ठानमध्येच विस्तारकांना प्रशिक्षण दिलेले आहे. विस्तारकांनी त्यांची दैनंदिनी एका साध्या कार्यकर्त्याप्रमाणेच ठेवली आहे. गावात सामान्य कार्यकर्त्यांशी नाळ जुळावी, यासाठी विस्तारकांना आचरण बंधनकारक आहे.

एकूण बुथसंख्या (कंसात रचना पूर्ण झालेली बुथसंख्या)

कर्जत-जामखेड- ३४५ (३४५), नेवासा-२६४ (२३५), नगर शहर-२६४ (११९), श्रीरामपूर- २९१ (१९६), अकोले -३०४ (२८०), संगमनेर -२६५ (२०२), राहुरी- ३००(२९३), कोपरगाव-२६२ (२२७), पारनेर-३६९ (२००), शिर्डी-२५५ (४५), श्रीगोंदा -३३५ (१७९). एकूण-३५९९ (२६६४).

बुथरचना स्ट्राँग असलेला सध्या भाजप एकमेव पक्ष आहे. बुथला जोडलेल्या कार्यकर्त्यांची नावे, पत्ता, मोबाईल क्रमांक याची माहितीच अ‍ॅपवर आहे. जिल्ह्यात नव्याने सव्वालाख कार्यकर्ते थेट भाजपशी जोडले जाणार आहेत. त्यामुळे तळापर्यंत भाजप मजबूत झाला आहे. भारतीय जनता पक्षाची आगामी निवडणुकांसाठीची ही एकप्रकारे तयारीच आहे.-प्रा. भानुदास बेरड, जिल्हाध्यक्ष-ग्रामीण, भाजप

टॅग्स :AhmednagarअहमदनगरBJPभाजपाChief Ministerमुख्यमंत्री