शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

नगरमधील चार मटकाकिंग जिल्ह्यातून हद्दपार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2018 14:17 IST

नगर शहरात मटकाकिंग म्हणून ओळख असलेल्या राजू उर्फ राजूमामा दत्तात्रय जाधव याच्यासह चार मटका बुकींना दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे.

अहमदनगर : नगर शहरात मटकाकिंग म्हणून ओळख असलेल्या राजू उर्फ राजूमामा दत्तात्रय जाधव याच्यासह चार मटका बुकींना दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे.जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी ही कारवाई केली. जाधव याच्यासह जगदीश वामन वाकोडे (रा. सिव्हिल हडको, नगर), संजय रामचंद्र पेठकर (तोफखाना) व विजय गंगाराम गवळी यांचा समावेश आहे. हद्दपार केलेले चार जण नगर शहरात विविध ठिकाणी मटका अड्डे चालवितात. त्यांच्यावर तोफखाना पोलीस ठाण्यात मुंबई जुगार कायदा, लॉटरी अधिनियम प्रमाणे अनेक गुन्हे दाखल आहेत. तोफखाना पोलीसांनी जाधव याच्यासह इतर तिघांविरोधात पोलीस अधीक्षकांकडे टोळी तडीपारीचा प्रस्ताव दाखल केला होता. याबाबत चौकशी करून पोलीस अधीक्षक शर्मा यांनी शुक्रवारी या चौघांना जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार केल्याचे आदेश काढले. पोलीसांच्या या कारवाईने मटका चालकांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे. दरम्यान महापालिका निवडणूक नजरेसमोर ठेवून राजूमामा जाधव याने नुकताच शिवसेना पक्षात प्रवेश केला होता. आत थेट पोलीसांनीच जिल्ह्यातून जाधव याला हद्दपार केले आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar policeअहमदनगर पोलीस