अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरूण गायकवाड होते. महाविद्यालयातील प्राणीशास्त्र विभागप्रमुख डॉ. वंदना भवरे, समन्वयक प्रा. श्रीहरी पिंगळे, डॉ. प्रणव बर्दापूरकर आदी उपस्थित होते. डॉ. हर्षल यांनी मानव ‘ह्युमन ॲटलास इनिशीएटीव्ह’ या प्रकल्पांतर्गत शास्त्रीय संदर्भाचे वाचन व अभ्यास करण्याचे तंत्र, डॉ. दातार यांनी ‘टिशू कल्चर’चे तंत्र तर प्रा. कस्तुरे यांनी संख्याशास्त्र या विषयाचे ‘संशोधनामधील महत्त्व व उपयोग’ यावर मार्गदर्शन केले. प्रास्ताविक विभागप्रमुख डॉ. भवरे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. पिंगळे यांनी केले. डॉ. सीमा बोरगावे यांनी आभार मानले. प्राणीशास्त्र विभागातील डॉ. रुपेंद्र भागडे, डॉ. प्रियंका डुबे, वर्षा पवार, ऋतू विखे, तनुजा सहाणे, प्रज्ञा बाप्ते, प्रभावती फटांगरे, सुप्रिया म्हस्के आदींनी सहभाग घेतला.
संगमनेर महाविद्यालयात व्याख्यानमाला उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:20 IST