आमदार डॉ. सुधीर तांबे, जिल्हा समाजकल्याण अधिकारी देवीदास कोकाटे, संग्राम संगमनेर संस्थेचे पदाधिकारी डॉ. अरविंद रसाळ, सूर्यकांत शिंदे, डॉ. नामदेव गुंजाळ यावेळी उपस्थित होते. चित्रकला स्पर्धेचे उद्घाटन लायन्स क्लब ऑफ संगमनेर सफायरचे अध्यक्ष देवीदास गोरे यांच्या हस्ते करण्यात आले. विकास भालेराव यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. स्पर्धेचे उद्घाटन नाशिक जिल्हा रुग्णालयातील डॉ. निरंजन कथले यांनी केले, तर परीक्षक म्हणून रोटरी मूकबधिर विद्यालयाचे वाचा उपचारतज्ज्ञ मंगेश सालपे यांनी काम पहिले. परीक्षण विशेष शिक्षक भाऊसाहेब नरवडे व कला शिक्षक विकास भालेराव यांनी केले. मुख्याध्यापक वाय.डी. देशमुख, सुनील कवडे, अर्चना मुंतोडे, रंजना हासे, संजय मासाळ, समीर शिंदे, सुभाष रागीर, सुनीता टिळेकर, साहेबराव गुंजाळ, सुदाम राऊत यांनी मार्गदशन केले, तर आभारप्रदर्शन डॉ. देवेंद्र ओहरा निवासी मतिमंद विद्यालयाचे मुख्यध्यापक चांगदेव खेमनर यांनी केले.
दिव्यांग दिनाच्या निमित्ताने स्पर्धा उत्साहात
By | Updated: December 5, 2020 04:38 IST