अहमदनगर महानगरपालिकेच्या हद्दीत येणाऱ्या नालेगाव व केडगाव अमरधाम येथे महापालिकेच्या वतीने ठेकेदारामार्फत अंत्यविधीसाठी लागणारे सरपण, गोवऱ्या व इतर साहित्याची विक्री केली जाते. या दोन्ही ठिकाणच्या अंत्यविधीच्या साहित्याच्या दरात फार मोठी तफावत आहे. केडगाव येथे सरपण ३०० रुपये प्रतिमन या दराने विक्री केले जाते तसेच शेणाची गोवरी ५०० रुपये शेकडा या दराने विक्री केली जाते तर नालेगाव अमरधाम याठिकाणी सरपण २०० रुपये प्रतिमन व गोवरी ९० रुपये या दराने विक्री केली जाते. आपणच नेमलेल्या ठेकेदारांच्या दरांमध्ये तफावत का आहे, याचा शोध घेऊन केडगाव अमरधाम येथील ठेकेदाराचा ठेका रद्द करून त्या ठिकाणी नगर अमरधाममधील ठेकेदाराच्या दरात सदर साहित्याची विक्री करणार्या ठेकेदारांची नेमणूक करावी, असे निवेदनात म्हटले आहे.
केडगाव अमरधाममध्ये अंत्यविधी साहित्याची जादा दराने विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:21 IST