मांडवगण : रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमीन नापीक होत आहे. त्यातून मिळणाऱ्या अन्नधान्यामुळे मानवी जीवन उद्ध्वस्त होऊ लागले आहे. त्यामुळे सेंद्रिय शेती काळाची गरज आहे, असे आवाहन कृषिदूत सौरभ काळे याने केले. डाॅ. विठ्ठलराव विखे पाटील काॅलेज ऑफ ॲग्रिकल्चर विळद घाट (ता.नगर) यांच्या वतीने खांडगाव (ता.श्रीगोंदा) येथे कृषी जागरूकता व कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत काळे हा येथे विविध प्रकारची माहिती घेत आहे. यावेळी सरपंच काका ढवळे, ग्रा.पं. सदस्य आंनद शिंदे, सोसायटीचे संचालक रमेश शिंदे, किसन जवादे, पप्पू टकले आदी उपस्थित होते. यावेळी तो बोलत होते. प्राचार्य डाॅ. एम.बी. धांडे, उपप्राचार्य डाॅ. एच. एल. शिरसाठ, प्रा. दांगडे, भोसले, राऊत यांचे त्याला मार्गदर्शन लाभत आहे.
----
२४ मांडवगण