शहरं
Join us  
Trending Stories
1
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
2
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
3
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
4
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
5
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
6
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
7
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
8
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
9
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
10
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
11
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू
12
आधी कारने उडवले, मग शस्त्राने भोसकले; अमरावतीत पोलिस अधिकाऱ्याचा खून
13
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
14
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
15
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
16
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
17
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
18
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
19
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
20
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे

इच्छुकांच्या यादीत दररोज भर

By admin | Updated: October 13, 2016 00:44 IST

अकोले : तालुक्यातील पंचायत समितीच्या बारा गणांपैकी केवळ दोन जागा सर्वसाधारण प्रवर्गासाठी असून, अनुसूचित जमातीसाठी सहा

अकोले : तालुक्यातील पंचायत समितीच्या बारा गणांपैकी केवळ दोन जागा सर्वसाधारण प्रवर्गासाठी असून, अनुसूचित जमातीसाठी सहा, नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी तीन व अनुसूचित जातीसाठी एक अशा राखीव झाल्या. तसेच जिल्हा परिषद सहा गट असून, सर्वसाधारण प्रवर्गासाठी चार, तर सर्वसाधारण प्रवर्ग महिलांसाठी दोन गट राखीव असल्याने दिवसागणिक इच्छुकांची यादी वाढत चालली आहे. सत्तेचा सोपानाची स्वप्न अनेकांना दिवसाढवळ्या पडू लागली असून, इच्छुकांची भाऊगर्दी सर्व पक्षांना डोकेदुखी ठरणार आहे.तालुक्यात १४६ ग्रामपंचायतींत १८९ गावे असून, २ लाख ७२ हजार १३६ मतदार आहेत. यात अनुसूचित जातीचे ११ हजार ६७०, तर १ लाख ३८ हजार १६८ अनुसूचित जमातीचे मतदार आहेत. धामणगाव आवारी गट सर्वसाधारण व्यक्तीसाठी असल्याने येथे पुन्हा विद्यमान जिल्हा परिषद सदस्य कैलास वाकचौरे यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. कळस बुद्रुक गावात बैठक होऊन गावाने वाकचौरे यांचे पाठीशी उभे राहण्याची भूमिका घेतल्याचे समजते़ गतवेळी अडीचशे मतांनी पराभवास सामोरे गेलेल्या अनिता धुमाळ यांनी शिवसेनेकडून पुन्हा मोर्चेबांधणी सुरू केली आहे. गटात सर्वाधिक मतदान धामणगाव आवारी येथे असून, या गावातील विद्यमान पंचायत समिती सदस्य आप्पासाहेब आवारी यांची उमेदवारी तालुक्यातील सत्ताधारी राष्ट्रवादीला शह देऊ शकते. भाजपचे शिवाजी धुमाळ, काँग्रेसचे विक्रम नवले, सेवानिवृत्त प्राध्यापक विलास नवले आदींसह अगस्तीचे माजी उपाध्यक्ष प्रकाश नवले, बाळासाहेब भोर, राहुल देशमुख, अनिल सावंत अशी प्रत्येक गावातून दोन, चार इच्छुक आहेत. धामणगाव आवारी व धुमाळवाडी दोन्ही गण अनु.जमातीसाठी राखीव असल्याने सेनेचे डॉ. शरद तळपाडे, माकपच्या लताबाई मेंगाळ यांचा इच्छुकांमध्ये समावेश आहे़देवठाण गट खुल्या प्रवर्गासाठी असल्याने राष्ट्रवादीत उमेदवारीसाठी सर्वांत जास्त रस्सीखेच आहे. यामुळे पुन्हा विद्यमान सदस्य परबत नाईकवाडी यांच्या गळ्यात उमेदवारी पडू शकते? पंचायत समिती सदस्य अरुण शेळके व अगस्तीचे माजी संचालक अशोक शेळके, मेहेंदुरी सोसायटीचे चेअरमन अरुण फरगडे, विकास शेटे, सूर्यभान सहाणे, तसेच ज्येष्ठ नेते मीनानाथ पांडे हेदेखील दावेदार असतील. भाजपचे जालिंदर वाकचौरे, दादापाटील वाकचौरे, रावसाहेब दळवी आदी इच्छुकांची मोठी यादी आहे.(तालुका प्रतिनिधी)