शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

खर्डा हत्याकांडाच्या अभ्यासासाठी समितीची स्थापना, खासदार अमर साबळे यांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 20:24 IST

खर्डा येथील नितीन आगे हत्याकांडातील आरोपींना जिल्हा सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्त केले आहे. यामुळे दलित संघटनामध्ये असंतोष निर्माण झाला आहे. ही संपूर्ण तपास प्रक्रिया संशयास्पद असल्याने सरकार उच्च न्यायालयात जाणार आहे.

अहमदनगर : खर्डा येथील नितीन आगे हत्याकांडातील आरोपींना जिल्हा सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्त केले आहे. यामुळे दलित संघटनामध्ये असंतोष निर्माण झाला आहे. ही संपूर्ण तपास प्रक्रिया संशयास्पद असल्याने सरकार उच्च न्यायालयात जाणार आहे. त्यापूर्वी या प्रकरणाचा अभ्यास करण्यासाठी समिती स्थापन करण्यात येणार आहे. ही समिती पोलीस तपास आणि न्यायालयीन तपास प्रक्रियेचा अभ्यास करणार असल्याचे खासदार अमर साबळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.साबळे म्हणाले, खर्डा हत्याकांडातील आरोपींना न्यायालयाने निर्दोष मुक्त केल्याने दलित संघटनामध्ये असंतोष निर्माण झाला आहे. त्यामुळे सरकारच्या वतीने मी आगे कुटुंबीयांना भेट देऊन सात्वंन केले आहे. आम्ही प्राधान्याने आगे कुटुंबीयास पोलीस संरक्षण देणार आहोत. त्यानंतर आरोपींना शिक्षा होण्यासाठी उच्च न्यायालयात जाणार आहोत. अ‍ॅट्रासिटीअंतर्गत कुटुंबीयांचे पुनर्वसन केले जाणार आहे. हे संपूर्ण प्रकरण सरकार हाताळणार आहे. तपासाअंतर्गत हलगर्जीपणा तसेच जाणीवपूर्वक त्रुटी ठेवणा-यांवर कारवाई करण्यात येणार आहे. चांगला वकील नेमून हे प्रकरण हाताळण्यात येणार आहेत. या संपूर्ण प्रकरणाच्या अभ्यासासाठी समिती नेमण्यात येणार आहे़ शासनाचे निधी खाते, जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी व जिल्हा सरकारी वकील यांचा या समितीमध्ये समावेश असेल. ही समिती एफआयआर दाखल होण्यापासून निकालापर्यंतचा सखोल अभ्यास करेल. ही सर्व प्रक्रिया तातडीने राबविण्यात येणार आहे. मुख्यंमत्र्यांच्या सूचनेप्रमाणे मी आगे कुटुंबीयांची भेट घेतली आहे. या प्रकरणात शासन सर्वतोपरी मदत करणार असल्याची साबळे यांनी सांगितले.

रयतच्या संचालकांना कारवाई करण्यास सांगणार

कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचारातून रयत शिक्षण संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. सामाजिक समरसता व सत्याचे धडे या संस्थेमधून दिले जातात. मात्र खर्डा येथील रयत शिक्षण संस्थेच्या शाळेतीलच कर्मचारी फितूर झाले. त्यामुळे संस्थाअंतर्गत त्यांची चौकशी करावी. या कर्मचा-यांवर कारवाई करावी, अशी मागणी रयत शिक्षण संस्थेच्या संचालकांकडे करणार असल्याचेही अमर साबळे यांनी सांगितले.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर