शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

अण्णाभाऊ साठे, अमर शेख यांचे स्मारक उभारा; लोककलेचा वारसा जपण्याची मागणी; बोधेगावात अण्णाभाऊंच्या अस्थी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2020 14:33 IST

आपल्या रचना बुलंद आवाजात गात संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा यशस्वी प्रचार करणारे, समाजातील उपेक्षितांच्या उद्धारासाठी वाणीच्या माध्यमातून आजन्म काम केलेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, शाहीर अमर शेख यांचे स्वप्न असलेले शाहिरी विद्यापीठ व अण्णाभाऊ साठेंचे स्मारक बोधेगाव (ता. शेवगाव) येथे शासनाने उभारावे, अशी मागणी लोककलेच्या उपासकांनी केली आहे.

शेवगाव : आपल्या रचना बुलंद आवाजात गात संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा यशस्वी प्रचार करणारे, समाजातील उपेक्षितांच्या उद्धारासाठी वाणीच्या माध्यमातून आजन्म काम केलेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, शाहीर अमर शेख यांचे स्वप्न असलेले शाहिरी विद्यापीठ व अण्णाभाऊ साठेंचे स्मारक बोधेगाव (ता. शेवगाव) येथे शासनाने उभारावे, अशी मागणी लोककलेच्या उपासकांनी केली आहे.

अमर शेख यांच्या स्मृतिदिनानिमित्त ‘लोकमत’मध्ये शनिवारी ‘अमर शेख यांना काढायचे होते शाहिरी विद्यापीठ’ हे वृत्त प्रकाशित झाले. या वृत्ताचे जिल्ह्यातील नागरिकांनी स्वागत केले. बोधेगावशी अण्णाभाऊ साठे व अमर शेख या दोघांच्याही स्मृती जडलेल्या आहेत. येथे शाहिरी विद्यापीठ निर्माण करण्याचे स्वप्न या दोघांनीही पाहिले होते. या विद्यापीठासंदर्भात अण्णाभाऊ साठे व अमर शेख यांनी तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची भेट घेतल्याचा उल्लेख शाहीर बाळ पाटस्कर यांच्या ‘चाक दांड्या’ आत्मचरित्रात आढळतो. 

१८ जुलै १९६९ साली अण्णाभाऊ साठे यांचे मुंबईत निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मुंबई येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर त्यांचे निकटवर्तीय असलेले शाहीर अमर शेख यांनी १ आॅगस्ट १९६९ रोजी अण्णांच्या अस्थी बोधेगाव येथील शाहीरनगर येथील जमिनीत जतन केल्या आहेत. या दोनही लोकशाहिरांना अभिवादन करण्यासाठी शाहिरी विद्यापीठ उभारले जाणे आवश्यक आहे. 

अशा भावना नागरिकांनी व्यक्त केल्या. त्या ठिकाणी अण्णांचे भव्य स्मारक व शाहिरी विद्यापीठ उभारण्याचा चंग अमर शेख यांच्यासह इतर शाहिरांनी बांधला होता. मात्र पुढच्याच महिन्यात अमर शेख यांचे अपघाती निधन झाले. त्यामुळे विषय मागे पडला. 

बोधेगावच्या भूमीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, अमर शेख तसेच इतर शाहिरांचे वास्तव्य होते. त्यांनी समाजातील उपेक्षितांना न्याय मिळवून देण्यात मोठे योगदान दिले आहे. येथे अण्णाभाऊंचे स्मारक आणि शाहिरी विद्यापीठ उभारण्यासाठी मदत करू.   

 -नितीन काकडे, उपसरपंच, बोधेगाव

शासनाने बोधेगावातील जागेचा प्रश्न मार्गी लावावा. या पावन भूमीत शाहिरी कलाभवन व स्मारक उभारून अण्णाभाऊ साठे व अमर शेख यांच्या स्मृती जतन कराव्यात. जन्मशताब्दी वर्षानिमित्त अण्णाभाऊंना हिच खरी आदरांजली ठरेल.     - अशोक शिंदे,अध्यक्ष, शाहू, फुले, आंबेडकर, साठे, कलाम सामाजिक विचार मंच.

अमर शेख, अण्णाभाऊंच्या विचारांच्या लोकांनी एकत्र येऊन पाठपुरावा करायला हवा. क्रांतीचे स्फुल्लींग पेटविणारी कला म्हणजे शाहिरी आहे. ही क्रांतीज्योत सदैव तेवत ठेवण्यासाठी आणि शाहिरी कला जिवंत ठेवण्यासाठी या प्रश्नी शासनाने पुढाकार घ्यावा.  

 -अ‍ॅड. शिवाजीराव काकडे, शेवगाव.

शाहिरी विद्यापीठाबाबतचे ‘लोकमत’मधील वृत्त शनिवारी वाचले. वन क्लिक सिंड्रोमच्या जमान्यात अस्तंगत होत चाललेली कला जपण्याचा याहून मोठा मार्ग काय असू शकतो की त्या कलेचा अभ्यासक्रमात समावेश करणे. त्यानिमित्ताने एका मोठ्या ऐवजाचा धांडोळा जतन होईल आणि पुढच्या अनेक पिढ्यांसाठी एक वारसा तयार होईल. हा नगरचा एक अर्थाने सन्मान आहे. शाहीर अण्णाभाऊ साठे व अमरशेख यांच्या स्मृती बोधेगावच्या मातीशी जुळलेल्या असल्याने त्यांना अभिवादन करण्यासाठी उचित पाऊल उचलणे आवश्यक आहे.         -मिलिंद शिंदे, अभिनेता 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSocialसामाजिक