शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

अहमदनगर : छत्रपती संभाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारा; स्मारक कृती समितीचे उपोषण

By अरुण वाघमोडे | Updated: April 28, 2023 19:04 IST

 प्रत्यक्ष कामाला प्रारंभ झाल्यानंतरच उपोषण मागे घेण्याचा पवित्रा समितीतील सदस्यांनी घेतला आहे.

अहमदनगर : नगर शहरातील प्रोफेसर कॉलनी चौकात छत्रपती संभाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याचे काम तातडीने सुरू करावे, या मागणीसाठी स्मारक कृती समितीच्यावतीने प्रोफेस चौकात उपोषण सुरू करण्यात आले आहे. प्रत्यक्ष कामाला प्रारंभ झाल्यानंतरच उपोषण मागे घेण्याचा पवित्रा समितीतील सदस्यांनी घेतला आहे.

प्रोफेसर चौकात छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा उभारण्याचे नियोजित आहे. मनपा प्रशासनाच्या दिरंगाईमुळे हे काम अद्याप सुरू झाले नाही. पूर्णाकृती पुतळा उभारण्याकरिता चौथाऱ्याच्या कामाची ई- निविदा प्रक्रिया झालेली असताना देखील प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे कामास विलंब होत असल्याचे आरोप समितीने केला आहे. दरम्यान मनपाचे उपायुक्त यशवंत डांगे व बांधकाम विभागाचे उपअभियंता श्रीकांत निंबाळकर यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली.

पुतळ्याचा चौथरा व शुशोभिकरण संदर्भात स्थायी समितीकडे प्रस्ताव सादर केला आहे. समितीची मान्यता मिळाल्यानंतर संबंधित ठेकेदाराला तत्काळ कार्यारंभ आदेश देण्यात येईल, असे यावेळी दोन्ही अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र पुतळा ज्या ठिकाणी बसवयाचा आहे तो भूखंड ताब्यात घेऊन तेथे कंपाउंड तयार करा, अशी मागणी समितीने केली आहे. दरम्यान या उपोषणाला फुले ब्रिगेडच्यावतीने पाठिंबा देऊन पदाधिकारी या उपोषणात सहभागी झाले.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर