शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जामखेड शहरातील अतिक्रमण हटविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2020 16:14 IST

जामखेड रहदारीला अडथळा ठरणाºया खर्डा चौकातील टप-या राज्य राखीव पोलीस दलाच्या बंदोबस्तात शनिवारी दुपारी उचलण्यात आल्या. त्यामुळे मोठ्या कालावधीनंतर या चौकाने मोकळा श्वास घेतला. 

जामखेड : रहदारीला अडथळा ठरणाºया खर्डा चौकातील टप-या राज्य राखीव पोलीस दलाच्या बंदोबस्तात शनिवारी दुपारी उचलण्यात आल्या. त्यामुळे मोठ्या कालावधीनंतर या चौकाने मोकळा श्वास घेतला. याच ठिकाणी मोठ्या प्रमाणावर होणाºया बॅनरबाजीनेही शहराचे विद्रूपीकरण होत असे. तेही आता थांबणार आहे. अतिक्रमण काढलेल्या ठिकाणी नगरपरिषदेच्या वतीने आता वृक्षलागवड केली जाणार आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शहरातील दोन किलोमीटर परिसर एक महिन्यापासून हॉटस्पॉटमध्ये आहे. रस्ते जरी मोकळे असली तरी या चौकात मोठ्या प्रमाणावर टपºया असल्याने रहदारीला अडथळा येतो. आठवडे बाजारच्या दिवशी दिवसभर वाहतूक ठप्प असते. तसेच हा शहरातील महत्त्वाचा चौक आहे. येथे रहदारी असते. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणावर बॅनरबाजीही केली जाते. यामुळे चौक विद्रूप होतो. यामुळे तहसीलदार विशाल नाईकवाडे, मुख्याधिकारी सुहास जगताप, पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील यांनी शनिवारी दुपारी अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली. काही टपºया, दुकानांपुढील शेड काढण्यात आले. यामुळे खर्डा चौकाने मोकळा श्वास घेतला. अतिक्रमण काढलेल्या ठिकाणी दहा फूट उंच झाडे लावण्याचा उपक्रम नगरपरिषदेने हाती घेतला आहे.  

टॅग्स :AhmednagarअहमदनगरJamkhedजामखेडroad safetyरस्ते सुरक्षा