शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

शिंगवे केशव येथील पाझर तलावात अतिक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 14:04 IST

पाथर्डी तालुक्यातील शिंगवे केशव गावाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटविण्यासाठी १९७२ मध्ये रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून तयार झालेल्या पाझर तलाव क्षेत्रालगत नगर येथील एका व्यापाऱ्याने अतिक्रमण करून जागा बळकाविण्याचा प्रयत्न केला आहे.

ठळक मुद्देशिंगवे केशव येथील गट क्रमांक ४०९, ९ व १० या क्षेत्रात सुमारे ४६ वर्षांपासून पाझर तलाव अस्तित्वात आहे.या तलाव क्षेत्राच्या लगतच नगर येथील एका व्यापा-याचे क्षेत्र असल्याने त्याने तलाव क्षेत्रातच अतिक्रमण करून तलावाच्या भिंतीचे नुकसान करण्याचा प्रयत्न केला आहे.

मिरी: पाथर्डी तालुक्यातील शिंगवे केशव गावाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटविण्यासाठी १९७२ मध्ये रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून तयार झालेल्या पाझर तलाव क्षेत्रालगत नगर येथील एका व्यापाऱ्याने अतिक्रमण करून जागा बळकाविण्याचा प्रयत्न केला आहे.शिंगवे केशव येथील गट क्रमांक ४०९, ९ व १० या क्षेत्रात सुमारे ४६ वर्षांपासून पाझर तलाव अस्तित्वात आहे. या तलावाच्या पाण्यावरच गावातील शेती अवलंबून आहे. काही प्रमाणात पिण्यासाठी देखील या तलावाच्या पाण्याचा वापर ग्रामस्थांकडून अनेक वर्षांपासून केला जात आहे.परंतु या तलाव क्षेत्राच्या लगतच नगर येथील एका व्यापा-याचे क्षेत्र असल्याने त्याने तलाव क्षेत्रातच अतिक्रमण करून तलावाच्या भिंतीचे नुकसान करण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे तलावाच्या भिंतीला तडे पडून पाणी वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.यासंदर्भात ग्रामस्थांनी सबंधित व्यापा-यास समज दिली असता त्याने अतिक्रमणामुळे तलावाच्या भिंतीला पडलेले खड्डे व तडे दुरूस्त करून देतो, असे सांगितले. परंतु गेल्या दहा दिवसांपासून कोणतेही दुरुस्तीचे काम झाले नसल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण आहे. वांबोरी चारीच्या माध्यमातून या भागाला मिळणारे पाणीदेखील याच तलावात सोडले जात आहे. तसेच पावसाचे पाणी देखील याठिकाणी मोठ्या प्रमाणात साचत असल्याने तलावाची लवकरात लवकर दुरूस्ती करणे अत्यंत गरजेचे झाले आहे. तसा ठराव देखील ग्रामसभेत करण्यात आलेला आहे. त्यामुळे येत्या चार दिवसांमध्ये संबधित व्यापा-याने तलाव दुरूस्ती न केल्यास त्याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

महसूल व ग्रामपंचायतीच्या दफ्तरी तलावाची नोंदच नाही

या तलावाची मुळा पाटबंधारे विभागाकडे केशव शिंगवे- ७३ पाझर तलाव अशी नोंद आढळते. यामुळे सुमारे दहा वर्षांपासून येथील शेतकरी लोकवर्गणीतून वांबोरी चारीची पाणीपट्टी देखील भरीत आले आहेत. तसेच जिल्हा परिषदेच्या माध्यमातून या तलावाची दोन वेळेस दुरूस्ती देखील करण्यात आली होती, परंतु असे असतानाही स्थानिक पातळीवरील महसूला व ग्रामपंचायत कार्यालयात या तलावाची स्वतंत्र नोंद आढळून येत नसल्याने अधिकारी व ग्रामस्थांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरPathardiपाथर्डी