शहरं
Join us  
Trending Stories
1
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम! अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
2
“CM, DCM यांची दिल्लीत वट, अतिवृष्टीच्या नुकसानभरपाईचा प्रस्ताव केंद्राला पाठवा”: वडेट्टीवार
3
शेअर बाजार लाल निशाणीवर बंद; तरीही Axis बँकेसह 'या' स्टॉक्सनी घेतली जोरदार झेप!
4
बायकोने मोबाईल मागितला, नवऱ्याने नाही दिला; संतापलेल्या पत्नीने मग घरातला चाकू घेतला अन्...
5
सरकारी नोकऱ्यांसाठी वयोमर्यादा शिथील करावी, काश्मिरी हिंदूंची मागणी; काय म्हणालं सर्वोच्च न्यायालय?
6
कंपनीचं एक स्पष्टीकरण आणि ₹३,४०० नं वाढली शेअरची किंमत; रचला इतिहास, भाव विक्रमी उच्चांकावर
7
'तो' वाद जीवावर बेतला! अवघ्या २० रुपयांसाठी काँग्रेस नेत्याच्या भावाची गोळ्या झाडून हत्या
8
Solapur: 'भैय्याला आधी काढा.. तो आत अडकला आहे'; भावाचा मृत्यू, बहिणीचा आक्रोश; मृतदेहच सापडला
9
सुनेत्रा अजित पवार यांचे NCP कार्यकर्त्यांना आवाहन; म्हणाल्या, “अतिवृष्टी हातात नाही, पण...”
10
Video: माजी मंत्री तानाजी सावंत यांचा बंगला पाण्याखाली; दोन-दोन टोयोटा फॉर्च्युनर पुरात बुडाल्या...
11
रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत प्रश्न विचारताच कर्नाटकचे उपमुख्यमंत्री संतापले, म्हणाले पंतप्रधानांच्यां निवासस्थानाबाहेरही...  
12
पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत फक्त व्याजातूनच ४.५ लाखांची कमाई; सोबत टॅक्समध्येही मिळतेय सूट
13
अभूतपूर्व परिस्थितीत तातडीच्या मदतीसह कायमस्वरुपी मदतीची गरज; अन्यथा शेती मोठ्या समस्येत - शरद पवार
14
Food: भरपूर गर असलेले सीताफळ कसे निवडावे? कच्चे फळ निवडल्यास काय असतो धोका?
15
सरकारी कर्मचारी आणि पेन्शधारकांना मोठी दिवाळी भेट! पगारात होणारी इतकी वाढ
16
'आपलं अफेअर विसरून जा'; फॉर्महाऊसवर नेऊन अत्याचार केल्याचा तरुणीची आरोप, पोलीस निरीक्षकावर गुन्हा
17
पुणे विमानतळावर पंढरपुरातील नेत्याच्या बॅगेत बंदुकीसह सापडली काडतुसे; तो नेता कोण?
18
PM मेलोनींच्या इटलीमध्ये हजारो आंदोलक रस्त्यावर, बस-रेल्वे गाड्यांची तोडफोड; 60 पोलीस जखमी
19
पेनी स्टॉक बनला मल्टीबॅगर, एका वर्षात केलं मालामाल; १ लाखांचे झाले ६८ लाखांपेक्षा अधिक
20
Accident Video: दोन बाईकचा थरकाप उडवणारा अपघात; हवेत उडाले, नंतर फूट दूर जाऊन पडले

जामखेडमधील खर्डा चौक ते अमरधाम रस्त्यावरील अतिक्रमणावर हातोडा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2018 12:42 IST

खर्डा चौक ते अमरधाम या रस्त्यावरील २६ अतिक्रमणधारकांनी पक्के बांधकाम करून रस्ता अरुंद केला.

जामखेड : खर्डा चौक ते अमरधाम या रस्त्यावरील २६ अतिक्रमणधारकांनी पक्के बांधकाम करून रस्ता अरुंद केला. आज सकाळी दहाच्या सुमारास पोलीस फौजफाट्यासह या रस्त्यावरील अतिक्रमणे काढण्यास सुरुवात केली. तहसीलदार तथा मुख्याधिकारी विशाल नाईकवडे यांच्या उपस्थितीत पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण काढण्यात येत आहे. नगरपरिषद अंतर्गत खर्डा चौक ते अमरधाम हा महत्त्वाचा असलेला सव्वा चार कोटी रुपये खर्चाचा रस्त्याचे काम सुरू झाले. परंतु अंदाजपत्रकाप्रमाणे असलेल्या रस्त्याच्या कामास पक्क्या बांधकामाचा अडथळा ठरला होता. त्यामुळे तहसीलदार तथा मुख्याधिकारी विशाल नाईकवडे यांनी सदर अतिक्रमणे काढण्यासाठी सुरवातीला खुणा करून करून देण्यात आल्या. त्यानंतर न्यायालयात कॅव्हेट दाखल करण्यात येऊन सर्व २६ अतिक्रमण धारकांना नोटीसा बजावण्यात येऊन आठ दिवसात अतिक्रमण काढून घेण्यास सांगितले. हि मुदत संपत आहे. तसेच महावितरण, सार्वजनिक बांधकाम, भारत दूरसंचार निगम, पोलीस स्टेशन यांना पत्रव्यवहार करून ४ व ५ आॅक्टोबर तारीख निश्चित केले होते. परंतु पुरेसा पोलीस फौजफाटा न मिळाल्याने अतिक्रमण काही काळ स्थगित झाले होते. आज बुधवार (दि. १०) रोजी सकाळी दहाच्या सुमारास मोठ्या पोलीस बंदोबस्तात व अतिक्रमण पथकासह रस्त्याचे शेवटचे टोक अमरधाम पासून तहसीलदार तथा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विशाल नाईकवाडे यांनी अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली. त्यामुळे अनेकांनी टप-या स्वरूपातील, तसेच घरासमोरील शेड, कंपोड काढण्यास सुरुवात केली. तर काही पक्के अतिक्रमण धारकांनी दोन तासाची मुदत मागवून घेतली आहे. खर्डा चौक ते आमरधाम या रस्त्यावरील अतिक्रमण निघत असल्याने रस्त्याचे भाग्य उजळणार आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरJamkhedजामखेड