शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

कोपरगाव तालुक्यातील मोक्कातील दरोडेखोरांना सक्तमजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2017 12:11 IST

नाशिक : अहमदनगर जिल्ह्याच्या कोपरगाव तालुक्यातील सराईत दरोडेखोर व मोक्कान्वये कारवाई करण्यात आलेले आरोपी नारायण नामदेव वायकर (३५, रा़ ...

नाशिक : अहमदनगर जिल्ह्याच्या कोपरगाव तालुक्यातील सराईत दरोडेखोर व मोक्कान्वये कारवाई करण्यात आलेले आरोपी नारायण नामदेव वायकर (३५, रा़ सोनेवाडी, ता़ कोपरगाव, जि़ अहमदनगर), राहुल संजय शिंगाडे (२५, रा़ सोनेवाडी, ता़ कोपरगाव, जि़ अहमदनगर) व सुनील शिवाजी थोरात (२२, रा़ डोºहाळे, ता़ राहाता, जि़ अहमदनगर) या तिघांना जिल्हा न्यायालयाचे विशेष न्यायाधीश एस़ आऱ शर्मा यांनी मंगळवारी (दि़१४) प्रत्येकी पाच वर्षे सक्तमजुरी व दहा लाख दोन हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली़ सरकारी वकील म्हणून शिरीष कोतवाल यांनी काम पाहिले़२८ मे २०१५ रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास भाऊसाहेब मोगल गायकवाड व विशाल अंबादास व्यवहारे या दोघांनी टेम्पोमध्ये वडगावपांग येथून कोंबड्यांचे खाद्य भरले व हा माल खाली करण्यासाठी वेस येथे जात होते़ रांझणगावाकडून वेसगावकडे जात असताना रात्री सव्वा दहा वाजेच्या सुमारास पाठीमागून काळ्या रंगाच्या दुचाकीवर आलेल्या तिघांनी त्यांचा टेम्पो अडवला व टेम्पोची चावी काढून घेत गायकवाड व व्यवहारे यांच्याकडील १२ हजार रुपये, मोबाइल, मतदान कार्ड, आधार कार्ड आदी कागदपत्रे घेऊन मारहाण करून फरार झाले़ यानंतर त्यांच्या आवाजामुळे नागरिक जमा झाले व त्यांना उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले़ या प्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता़ शिर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक भोसले यांनी या गुन्ह्णाचा तपास करून वायकर, शिंगाडे व थोरात या तिघांना अटक केल्यानंतर त्यांनी गुन्ह्णाची कबुली दिली़ या तिघांनी संघटितपणे केलेले दरोड्याचे गुन्हे पाहता त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव देण्यात आला होता़ त्यास तत्कालीन विशेष पोलीस महासंचालक जयजीत सिंग यांनी प्राथमिक मंजुरी दिली होती़ या दरोड्याचा तपास तत्कालीन उपविभागीय अधिकारी विवेक पाटील यांनी केल्यानंतर राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक कृष्णलाल विष्णोई यांनी मोक्का लावण्यास परवानगी दिली होती़ सरकारी वकील सुधीर कोतवाल यांनी या खटल्यात २० साक्षीदार तपासून आरोपींविरुद्ध पुरावे सादर केले होते़तिघेही सराईत दरोडेखोरमोक्कान्वये कारवाई करण्यात आलेला नारायण वायकर, राहुल शिंगाडे, सुनील थोरात हे तिघेही सराईत दरोडेखोर आहेत़ अहमदनगर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये वाईकर विरोधात दरोड्याच्या चौदा, शिंगाडे विरोधात दोन तर थोरात विरोधात १३ गुन्हे दाखल आहेत़

टॅग्स :AhmednagarअहमदनगरCourtन्यायालय