शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

कर्मचारी संप : जिल्हा परिषदेमध्ये १०० टक्के प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2018 15:24 IST

कर्मचा-यांच्या महत्वाच्या मागण्या शासन स्तरावर प्रदिर्घ कालावधीपासून प्रलंबित असल्याने राज्यभर संप पुकारण्यात आला असून अहमदनगर जिल्हा परिषद कर्मचा-यांनी संपात १०० टक्के प्रतिसाद दिला आहे.

अहमदनगर : कर्मचा-यांच्या महत्वाच्या मागण्या शासन स्तरावर प्रदिर्घ कालावधीपासून प्रलंबित असल्याने राज्यभर संप पुकारण्यात आला असून अहमदनगर जिल्हा परिषद कर्मचा-यांनी संपात १०० टक्के प्रतिसाद दिला आहे.जिल्हा परिषद कर्मचा-यांच्या महत्वाच्या मागण्या शासन स्तरावर प्रदिर्घ कालावधीपासून प्रलंबित आहे. यावर अनेकवेळाशासन दरबारी बैठका झाल्या, चर्चा झाल्या, यावर शासनस्तरावर सकारात्मक चर्चा होते परंतू आवश्यक तो शासन निर्णय काढलाजात नाही. शासन कर्मचा-यांच्या मागण्यांबाबत वेळकाढूपणाचे धोरण राबवत आहे.याबाबत कर्मचा-यांच्या भावना अतिशय तीव्र आहेत. म्हणूनच सर्व सघटनांशी चर्चा करून शासनाचे प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आजचा एक दिवसाचा लाक्षणिक संप केला आहे. आजच्या संपात प्रामुख्याने वेतनत्रुटी दूर करून ७ वा वेतना आयोग तातडीने लागू करणे. केंद्राप्रमाणे महागाई भत्ता देणे, अंशदायी पेंशन योजना बंद करून जुनी पेशंन योजना लागू करणे, सुधारीत आकृतीबंधाच्या नावाखाली कर्मचारी कपातीचे धोरण शासन राबवू पाहत आहे. त्यास सर्वच संघटनांनी कडाडून विरोध केला आहे, कंत्राटी कर्मचा-यांच्या नेमणूकाकायम करणे, युनियनच्या मागणीनुसार अनुकंपा भरती पुर्ववत चालू करणे यासह विविध मागण्यांसाठी आज संप पुकारण्यात आला आहे.महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियन-४३४०, लेखावर्गीय कर्मचारी संघटना, चतुर्थ श्रेणीकर्मचारी संघटना, कृषि कर्मचारी संघटना, आरोग्य कर्मचारी संघटना, वाहन चालक कर्मचारी संघटना, पशुचिकीत्सा व्यवसायी संघटना, ग्रामसेवक संघटना, पर्यवेक्षीका संघटना, शिक्षक संघटना याचबरोबर अहमदनगर जिल्हा पेन्शनर असोसिएशन या अशा अनेक संघटनांना सहभाग नोंदवून आजचा संप १००% यशस्वी केला असल्याचे कर्मचा-यांनी सांगितले.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar zpअहमदनगर जिल्हा परिषद