शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

नगरमध्ये १५ फेब्रुवारीपासून अकरावा प्रतिबिंब चित्रपट महोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 16:54 IST

जगभरात गाजलेले चित्रपट अगदी मोफत पाहण्याची सुवर्णसंधी दरवर्षी न्यू आर्टस् महाविद्यालयाच्या संज्ञापन अभ्यास विभागाच्या प्रतिबिंब चित्रपट महोत्सवात नगरकरांना मिळते. या वर्षी ११ वा प्रतिबिंब चित्रपट महोत्सव १५ ते १८ फेब्रुवारी दरम्यान होत आहे.

अहमदनगर : जगभरात गाजलेले चित्रपट अगदी मोफत पाहण्याची सुवर्णसंधी दरवर्षी न्यू आर्टस् महाविद्यालयाच्या संज्ञापन अभ्यास विभागाच्या प्रतिबिंब चित्रपट महोत्सवात नगरकरांना मिळते. या वर्षी ११ वा प्रतिबिंब चित्रपट महोत्सव १५ ते १८ फेब्रुवारी दरम्यान होत आहे. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांच्या हस्ते प्रतिबिंब महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे.हा महोत्सव महाविद्यालयातील राजर्षी शाहू महाराज सभागृहात आयोजित करण्यात आलेला असून रसिकांना सकाळी ९ ते रात्री ९ या वेळेत पाहता येईल. १५ व १६ फेब्रुवारी रोजी जगभरातील गाजलेले काही निवडक चित्रपट दाखवण्यात येणार आहेत. १७ व १८ फेब्रुवारी रोजी लघुपट आणि माहितीपट स्पर्धेत मानांकन मिळालेले लघुपट व माहितीपट दाखविले जाणार आहेत. विद्यार्थी आणि खुला गट अशा दोन गटात लघुपट व माहितीपटांची विभागणी करण्यात आलेली असून पहिल्या तीन क्रमांकासाठी पारितोषिके देण्यात येणार असून इतरही काही वैयक्तिक पारितोषिके देण्यात येणार असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एच. झावरे यांनी दिली.‘बायोग्राफिकल फिल्म्स’ अशी या वर्षीच्या प्रतिबिंब महोत्सवात दाखविण्यात येणा-या चित्रपटांची प्रमुख थीम आहे. जगातील नावाजलेल्या व्यक्तींच्या चरित्रावर आधारित चित्रपटांचा यामध्ये समावेश आहे. या महोत्सवाचा लाभ घ्यावा व अहमदनगरकरांना कलात्मक चित्रपट पाहण्याची संधी मिळावी, जागतिक चित्रपटांची तोंड ओळख व्हावी आणि अहमदनगरमध्ये चित्रपट संस्कृती वाढीस लागावी, असा उद्धेश या चित्रपट महोत्सवाचा असल्याची माहिती संज्ञापन अभ्यास विभाग प्रमुख प्रा. बापू चंदनशिवे यांनी दिली. रसिक प्रेक्षकांसाठी सदर चित्रपट महोत्सव विनामुल्य पाहता येणार असून प्रवेशिका महाविद्यालयातील संज्ञापन विभागात उपलब्ध करून देण्यात आल्या असल्याची माहिती या महोत्सवाचे संचालक प्रा. राहुल चौधरी यांनी दिली.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर