शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

श्रीरामपुरात शेती, पाणी प्रश्नावरच निवडणूक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2019 12:45 IST

श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात प्रारंभी एकतर्फी वाटणारी निवडणूक उत्तरार्धात मात्र चुरशीची बनली आहे. शेती व पाणी प्रश्न या निवडणुकीच्या केंद्रस्थानी आले आहेत. त्याच मुद्यावर काँग्रेस आघाडी व शिवसेना-मित्र पक्षाकडून एकमेकांवर तोफा डागल्या जात आहेत.

श्रीरामपूर विधानसभा - शिवाजी पवार । श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात प्रारंभी एकतर्फी वाटणारी निवडणूक उत्तरार्धात मात्र चुरशीची बनली आहे. शेती व पाणी प्रश्न या निवडणुकीच्या केंद्रस्थानी आले आहेत. त्याच मुद्यावर काँग्रेस आघाडी व शिवसेना-मित्र पक्षाकडून एकमेकांवर तोफा डागल्या जात आहेत.मतदारसंघात श्रीरामपूरसह राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा शहरासह ३२ गावांचा समावेश होतो. काँग्रेसच्या लहू कानडे यांच्यासाठी उपनगराध्यक्ष करण ससाणे समर्थकांनी मोट बांधली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अविनाश आदिक यांचे पदाधिकारीही सक्रिय आहेत. दुसरीकडे शिवसेनेच्या भाऊसाहेब कांबळे यांची जबाबदारी गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे व माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी स्वीकारली आहे.मंत्री राधाकृष्ण विखे यांनी येथे दहाहून अधिक दौरे केले. त्यांनी मतदारसंघात तळ ठोकल्याने निवडणूक हायप्रोफाईल बनली आहे. गेली वीस वर्षे दिवंगत जयंत ससाणे व विखे यांच्यात आघाडी राहिली. ती आता तुटली आहे. विखे व मुरकुटे अशी नवी युती जन्माला आली आहे.शिवसेना व भाजप येथे सन १९९० च्या दरम्यान अवघ्या ५ ते १० हजार मतांपुरती मर्यादित होती. मात्र मागील निवडणुकीत भाजपने ४५ तर सेनेने तब्बल ४० हजार मतांपर्यंतची मजल गाठली. ग्रामपंचायती, सेवा संस्था व सहकाराच्या परिघाबाहेरील नवीन कार्यकर्ते सेना-भाजपने जोडले. श्रीरामपूर शहरात त्यांची चांगली राजकीय ताकद आहे. देवळाली प्रवरा येथे चंद्रशेखर कदम यांच्या नेतृत्वाखाली पालिकेवर एकहाती सत्ता आहे.  दुसरीकडे काँग्रेसला मानणारा सर्वच थरातील वर्ग आहे. त्यामुळेच मोदी लाटेतही गतवेळी काँग्रेसने येथे बाजी मारली. सलग २० वर्षे पक्षाने येथे झेंडा रोवला. याखेपेलाही संगमनेरनंतर काँग्रेसला श्रीरामपुरातूनच अपेक्षा आहेत.माजी आमदार मुरकुटे यांच्या राजकीय खेळीतूनच कांबळेंना सेनेची उमेदवारी मिळाली. त्यात मंत्री विखे यांनी सर्वच नेत्यांना एका छताखाली आणले. विखे यांनी अंतिम टप्प्यात चमत्कार करण्याचे भाकित केले आहे. मात्र काँग्रेसकडूनही तितक्याच आक्रमकतेने प्रचार सुरू आहे.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून भाऊसाहेब पगारे, एमआयएम पक्षाकडून सुरेश जगधने, निवृत्त शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव हेदेखील रिंगणात आहेत. चुरशीच्या लढतीत ही मते निर्णायक ठरतील. अपक्ष व इतर उमेदवारांना उतरविण्यामागे खेळी असल्याचीही चर्चा रंगते आहे. निळवंडे धरणाचे कालवे व प्रवरा नदीपात्रातील भूमिगत बंधाºयावरून एकमेकांना शह काटशह देण्याचा प्रयत्न होतो आहे. त्यात आपसूकच माजी मंत्री मधुकरराव पिचड, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात व मंत्री राधाकृष्ण विखे हे प्रचारात ओढले जात आहेत.  प्रचारातील प्रमुख मुद्देआपण स्थानिक उमेदवार आहोत. लोकांसाठी सहजासहजी उपलब्ध होतो. राजकीय जीवनात साधेपणाने वावरतो. विखे व मुरकुटे यांच्या मदतीने तालुक्याच्या हक्काचे पाणी मिळवून देऊ. गत पाच वर्षे विरोधी पक्षात राहिलो. आता मात्र विकासाला चालना देऊ, असा प्रचार कांबळेंच्या वतीने केला जात आहे.काँग्रेसकडूनही कांबळे व सेना-भाजपचा समाचार घेतला जातो आहे. शेतमालाला हमी भाव नाही. कांद्याची निर्यात रोखली. दुष्काळी यादीतून तालुका वगळला गेला. पीक विम्याचा कुठलाही लाभ झाला नाही. कांबळे यांचा  प्रशासनावर वचक नाही, अशी टीका सुरू आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019