शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

महाविद्यालयांत ‘इलेक्शन फिवर’ : निवडणुका ७ सप्टेंबरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2019 13:13 IST

अखेर विद्यापीठाने महाविद्यालयांत विद्यार्थी प्रतिनिधी निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे.

अहमदनगर : अखेर विद्यापीठाने महाविद्यालयांत विद्यार्थी प्रतिनिधी निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार ७ सप्टेंबरला मतदान होणार असून, त्याचदिवशी मतमोजणी होऊन निकाल घोषित होईल. त्यानंतर २४ सप्टेंबरला विद्यापीठ विद्यार्थी परिषदेची निवडणूक होईल.मागील काही वर्षांपासून बंद करण्यात आलेल्या विद्यार्थी निवडणुका यंदा पुन्हा होणार आहेत. विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास मंडळाच्या संचालकांनी बुधवारी या निवडणुकांचे वेळापत्रक प्रसिद्ध केले. त्यानुसार विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालये, संस्था व विभागांमधील विद्यार्थी परिषदेच्या निवडणुकांची अधिसूचना २१ आॅगस्टला प्रसिध्द केली जाणार आहे. दि. २९ आॅगस्ट रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणे, ५ सप्टेंबरला अर्ज माघारी घेणे आणि उमेदवारांची अंतिम यादी प्रसिध्द केली जाईल. त्यानंतर ७ सप्टेंबर रोजी सर्व महाविद्यालयांमध्ये मतदान होईल. संबंधित महाविद्यालयांचे प्राचार्य सलग ४ तासांची मतदानाची वेळ निश्चित करतील. मतदानानंतर महाविद्यालयातच मतमोजणीकरून लगेच निकाल घोषित केला जाईल.महाविद्यालयांमधील निवडणुका झाल्यानंतर ९ सप्टेंबरला विद्यापीठ विद्यार्थी परिषदेची निवडणूक अधिसूचना प्रसिध्द केली जाईल. १४ व १५ सप्टेंबरला अर्ज दाखल करणे, १९ व २० सप्टेंबरला अर्ज माघारी घेणे, २४ सप्टेंबर मतदान, तर २७ सप्टेंबरला मतमोजणी व निकाल असा निवडणूक कार्यक्रम असेल.महाविद्यालय निवडणूक वेळापत्रकनिवडणुकीची अधिसूचना प्रसिध्द करणे - २१ आॅगस्टमागासवर्ग प्रतिनिधी ठरविण्यासाठी आरक्षण सोडत -  २३ आॅगस्टमतदार यादीवर लेखी आक्षेप नोंदवण - २६ आॅगस्टअंतिम मतदार यादी प्रसिद्ध करणे - २७ आॅगस्टउमेदवारी अर्ज दाखल करण - २९ आॅगस्टअर्ज छाननी करून वैध व अवैध अर्जांची यादी प्रसिध्द करणे - ३१ आॅगस्टअर्ज वैधतेबाबत आक्षेप सादर करणे - ३ सप्टेंबरअंतिम अर्जाची यादी प्रसिद्ध करणे - ४ सप्टेंबरअर्ज माघारी घेणे - ५ सप्टेंबरमतदान, मतदानानंतर मतमोजणी व निकाल - ७ सप्टेंबरउमेदवारांच्या खर्चाचा हिशोब सादर करणे - ९ ते २१ सप्टेंबर

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar collector officeअहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय