शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

प्रशासकीय अनास्थेचा कहर; न्यायासाठी अठरा वर्षे शिक्षकाची पायपीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2020 16:50 IST

सरकारी शाळेत ज्ञानदानाचे काम करणा-या शिक्षकाला चक्क अठरा वर्षे शासकीय पगाराची वाट पाहावी लागली. कोतूळ येथील शासकीय आश्रमशाळेत शिक्षक म्हणून रोजंदारीवर काम करणाºया सुरेश देवराम गिते हे शासनाच्या अनास्थेचा अनुभव घेत आहेत. 

मच्छिंद्र देशमुख  । 

कोतूळ : सरकारी शाळेत ज्ञानदानाचे काम करणा-या शिक्षकाला चक्क अठरा वर्षे शासकीय पगाराची वाट पाहावी लागली. कोतूळ येथील शासकीय आश्रमशाळेत शिक्षक म्हणून रोजंदारीवर काम करणाºया सुरेश देवराम गिते हे शासनाच्या अनास्थेचा अनुभव घेत आहेत. 

 कोतूळ येथील सुरेश देवराम गिते यांनी वीस वर्षापूर्वी एमएबीएड केले. २००२ साली राजूर आदिवासी प्रकल्पात शासकीय आश्रमशाळेत साठ रुपये रोजंदारीने काम केले. शिक्षक म्हणून केळी कोतूळ येथील आश्रमशाळेत काम सुरू केले. नोकरी पुन्हा मिळवण्यासाठी अधिकाºयांचे उंबरे झिझवले. नोकरीत कायम होऊ, या आशेवर अठरा वर्षे ते रोजंदारीवर काम करतात. त्यांनी राजूर प्रकल्पातील पाच शाळांत ज्ञानदानाचे काम केले. सध्या ते पळसुंदे येथे काम करतात. नोकरीची सुरवातही ५ सप्टेंबर २००२ ला झाली. 

 गिते चरितार्थ चालवण्यासाठी गावात हॉटेल चालवतात. दहा वर्षांपासून ते नोकरीत कायम होण्यासाठी न्यायालयीन लढा देत आहेत. त्यांच्याबरोबर तालुक्यातील चौदा तर राज्यातील पन्नास शिक्षक आश्रमशाळेत दहा ते पंधरा वर्षे रोजंदारीवर काम करतात. रोजंदारी व हॉटेल चालवून सर्वोच्च न्यायालयात त्यांनी पाठपुरावा केला. नुकताच सर्वोच्च न्यायालयाने त्यांना नोकरीत कायम करण्यासाठी आदिवासी विकास विभागाला तीन महिन्याच्या अवधीत कायम करून घेण्याचा आदेश दिला आहे. आता तरी हक्काची नोकरी मिळेल का?  हा प्रश्न गिते यांच्यासमोर आहे. 

अठरा वर्षांपासून आश्रमशाळेत रोजंदारीवर शिक्षक म्हणून काम करतो. दहा वर्षांपासून मी आणि राज्यातील पन्नास शिक्षकांनी खंडपीठ ते सर्वोच्च न्यायालय अशी लढाई दिली. संपूर्ण आयुष्य त्यातच गेलं मात्र गेल्या आठवड्यात सर्वोच्च न्यायालयाने तीन महिन्यात राजूर प्रकल्पातील चौदा व इतर अशा पन्नास शिक्षकांना कायम करण्याचे आदेश दिले आहेत. न्याय मागताना मोठी परवड झाली. - सुरेश गिते, शिक्षक, आदिवासी विकास विभाग. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरAkoleअकोलेEducation Sectorशिक्षण क्षेत्रTeachers Dayशिक्षक दिन