कोपरगाव : शहरातील आयेशा कॉलनीतील कत्तलखान्यातून आठ गायींची सुटका शहर पोलिसांनी बुधवारी पहाटे छापा टाकून केली़पोलीस निरीक्षक सुरेश शिंदे यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून शहरातील आयेशा कॉलनीत छापा टाकला, येथे एका पत्र्याच्या शेडमध्ये सहा गायी व दोन वासरांचे पाय बांधून ठेवलेले होते़ सहाय्यक पोलीस निरीक्षक व्ही़एस़ देवरे, पोलीस उपनिरीक्षक बी़ बी़ शिंदे, शैलेंद्र ससाणे, ए़ व्ही़ गवसणे, एम़ ए़ कुसारे, देशमुख, गवारे, मैंद, पालवे आदी पोलीस कर्मचारी कत्तलखान्यात पोहोचले़ त्यांनी जनावरांची सुटका केली़ गायींची सुटका करून त्यांना कोकमठाण येथील गोकुलधाम गोरक्षा केंद्रात पाठविण्यात आले़ सदर प्रकरणी सिकंदर शब्बीर कुरेशी याचेविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे़