कर्जत : गांडूळ खतनिर्मिती शाश्वत शेतीला नवसंजीवनी ठरेल, असे प्रतिपादन आमदार रोहित पवार यांनी केले. येथील रयत शिक्षण संस्थेच्या दादा पाटील महाविद्यालयाने उत्कृष्ट शैक्षणिक उपक्रमाबरोबरच एकूण ७५० चौरस फूट आकाराच्या जागेत ७ बेड तयार करून, त्यातून गांडूळ खत निर्मितीचा प्रकल्प सुरू केला आहे. महिन्याकाठी २.५ ते ३ टन गांडूळ खताची सध्या निर्मिती केली जात आहे. या प्रकल्पाचे उद्घाटन पवार यांच्या हस्ते झाले.
यावेळी बोलत होते. पवार म्हणाले, दादा पाटील महाविद्यालय हे शैक्षणिक उपक्रम राबविणारे जिल्ह्यातील नावाजलेले महाविद्यालय आहे. महाविद्यालयाने गांडूळ खतनिर्मितीचा हा प्रकल्प सुरू करून परिसरातील शेतकऱ्यांच्या शाश्वत शेतीला नवसंजीवनी ठरेल, असा हा उपक्रम राबविला आहे. या उपक्रमाचे रूपांतर भविष्यात लोक चळवळीत व्हावे, अशी अपेक्षा आहे.
दादा पाटील महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष राजेंद्र फाळके यांच्या संकल्पनेतून, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बाळ कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्राणिशास्त्र विभागाचे प्रा.दिग्विजय कुंभार हे या प्रकल्पाचे नियोजन करून त्याच्या यशस्वितेसाठी सतत प्रयत्न करत आहेत. महाविद्यालय विकास समितीचे सदस्य अंबादास पिसाळ, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य बाप्पासाहेब धांडे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील शेलार, रज्जाक झारेकरी आदी उपस्थित होते.
----
२० कर्जत दादा पाटील
कर्जत येथील रयत शिक्षण संस्थेच्या दादा पाटील महाविद्यालयाने सुरू केलेल्या गांडूळ खत प्रकल्पाचे उद्घाटन करताना आमदार रोहित पवार, समवेत राजेंद्र फाळके, अंबादास पिसाळ.