शहरं
Join us  
Trending Stories
1
एका रात्रीत मोठा गेम! महायुतीचेच ३ माजी आमदार भाजपा फोडणार?; स्थानिक कार्यकर्तेच संतापले
2
क्रिकेटमधील पराभव जिव्हारी लागला, १०० च्या स्पीडने कार पळवली; दिवाळीची खरेदी करणाऱ्यांना चिरडले
3
ट्रेनमधील पांढऱ्या बेडशीट्स विसरा; भारतीय रेल्वे आता देणार खास प्रिंटेड कव्हर ब्लँकेट्स !
4
दिवाळीत ₹6 लाख कोटींची विक्रमी उलाढाल; भारतीयांची 'Made In India' वस्तूंना पसंती
5
कोण आहे फ्रांसेस्का ऑर्सिनी? ज्यांच्याकडे ५ वर्षाचा ई-व्हिसा असूनही भारतात प्रवेश नाकारला
6
Crime: आधी हात-पाय बांधले, नंतर उशीनं तोंड दाबलं...; व्यसनमुक्ती केंद्रातील घटनेनं खळबळ!
7
ODI Record: वनडेमध्ये आतापर्यंत कधीच 'असं' घडलं नव्हतं, ते वेस्ट इंडीजनं केलं!
8
सोलापूरात भाजपात दुफळी! "बाहेरून येणाऱ्यांनी किमान ३-४ वर्ष पक्षाचं काम करावं, त्यानंतरच.."
9
मोठी बातमी! १२ हजार भावांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ; १६४ कोटींचा घोटाळा आला समोर
10
मुहूर्त ट्रेडिंग: शेअर बाजारात तेजी; निफ्टी वर्षाच्या सर्वोच्च पातळीवर, सेन्सेक्स 62 अंकांनी वधारला
11
Mumbai Fire: माजी उपमहापौर अरुण देव यांच्या अंधेरी येथील घराला आग
12
२० एकर जमिनीसाठी लेकीने आईचा घेतला बळी, पतीच्या मदतीने मृतदेह रिक्षात भरला अन् तितक्यात...
13
BCCI: "आशिया चषक भारताला न दिल्यास..." बीसीसीआयचा मोहसिन नक्वी यांना इशारा!
14
अमित शाह यांच्यावर गंभीर आरोप, प्रशांत किशोर यांनी दाखवला फोटो; जनसुराजच्या उमेदवाराचं अपहरण?
15
अमेरिकेचा 88 लाखांचा H-1B व्हिसा आजपासून लागू; भारतीयांना मोठा दिलासा...
16
Beed: फटाका विझलाय समजून पुन्हा पेटवायला गेला अन्...; बीडमध्ये सहा वर्षांच्या मुलासोबत भयंकर घडलं!
17
"तात्या विंचू तुम्हाला चावेल...", संजय राऊतांच्या टीकेवर महेश कोठारेंची प्रतिक्रिया, म्हणाले- "ते माझ्याविषयी जे बोलले..."
18
Alyssa Healy : बॅक टू बॅक सेंच्युरी, तरीही स्टार्कच्या बायकोवर आली बाकावर बसण्याची वेळ; कारण...
19
Bhai Dooj 2025: भाऊबीजेसाठी पार्लर ग्लो फक्त चार स्टेप मध्ये! तोही घरच्या साहित्यात, चेहऱ्यावर आणा नैसर्गिक तेज!
20
"मला तू आवडत नाहीस, कधीच आवडणार नाहीस"; व्हाईट हाऊसमध्ये राडा, ऑस्ट्रेलियन राजदूताला ट्रम्प यांचा टोला

भूकंपाचे पूर्वानुमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2019 10:38 IST

पृथ्वीवर घडणाऱ्या अनेक नैसर्गिक बदलांचे सर्वांना नेहमीच कुतूहल वाटत असते. यामध्ये नैसर्गिक आपत्ती हा महत्वाचा भाग असतो.

अनिल लगडअहमदनगर : पृथ्वीवर घडणाऱ्या अनेक नैसर्गिक बदलांचे सर्वांना नेहमीच कुतूहल वाटत असते. यामध्ये नैसर्गिक आपत्ती हा महत्वाचा भाग असतो. ही आपत्ती मानव आपल्या चुकांमुळेच ओढून घेत आहे. या चुकांमुळे निसर्गचक्र बदलून गेले आहे. त्यामुळे भूकंप, पूर, वादळ, सुनामीसारखी नैसर्गिक आपत्ती कधी, केव्हा, कशी येईल याचा अंदाज बांधणे कठीण आहे. यातून आजकाल जीवित हानीही मोठ्या प्रमाणात होऊ लागली आहे. भूकंपाच्या बाबतीत अचूक अंदाज बांधणे आजही कठीण आहे. परंतु संशोधनातून किंवा प्राणी, पक्षी, वातावरणीय बदलातून भूगर्भातील हालचालींचे अंदाज बांधले जातात. वातावरणीय बदलावर अनेक शास्त्रज्ञ जगात अभ्यास करीत आहेत. भूकंपाचे पूर्वानुमान प्राणी, पक्षी, मासे, कीटक, मानवाच्या हालचालीवरुन कसे करता येईल याच्या संवेदना नगर शहरातील सुधाकर विठ्ठल केदारी जाणतात. त्यांना पशू-पक्ष्यांप्रमाणे भूकंपाच्या संवेदना जाणवतात.केदारी यांनी आता वयाची ७८ वर्षे पूर्ण केली आहेत. त्यांचा जन्म १६ जून १९४० मध्ये झाला. त्यांनी प्रारंभी दूरसंचार खात्यात नोकरी केली. लाईन इन्स्पेक्टर पदावरुन ते सेवानिवृत्त झाले. त्यांचे शिक्षण केवळ सातवीपर्यंतच झाले आहे. दूरसंचारमध्ये असताना त्यांनी भूगर्भातील हालचालींविषयी अभ्यासासाठी सुरूवात केली. त्यांनी राज्यातील विविध ठिकाणी जाऊन माहिती घेतली. शेतकºयांना भूजल स्त्रोताची माहिती दिली. जमिनीतील खडकांच्या प्रकाराचा अभ्यास करुन जमिनीतील खडकांच्या थरांचा अभ्यास केला. पाऊस, हवामान याविषयीही ते माहिती सहज देतात. त्यांनी सेवानिवृत्त कृषी अधिकारी सुधीर दत्तात्रय फडके यांना या अभ्यासाविषयी माहिती दिली. फडके यांनी नांदेडचे डॉ. रवींद्र रसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली केदारी यांच्या अनुभवाचे बोल ‘शोध भूकंपाचा’ या पुस्तकात शब्दबध्द केले. यातून केदारी यांना उभारी मिळाली. त्यातून त्यांनी आपल्या भूगर्भाच्या हालचालींचा अभ्यास सुरूच ठेवला. केदारी यांनी राजकीय, प्रशासकीय, शास्त्रज्ञांना देखील याची माहिती दिलीच, परंतु लोकांमध्ये पर्यावरणाबद्दल जनजागृती करण्याचे काम देखील केले. अजूनही हे कार्य सुरूच आहे. नगरमधील माध्यमांनी देखील त्यांना अनेकदा व्यासपीठ उपलब्ध करुन दिले आहे. आजही जगात कोठेही विनाशकारी भूकंप आला किंवा नगर जिल्ह्यातील बोटा, संगमनेरमध्ये भूकंपाचे धक्के जरी बसले तरी केदारी हे माध्यमांना ते का झाले? याची माहिती स्वत: फोनवरुन देत असतात.मानवाने निसर्गाशी फारकत घेतल्यामुळे फार मोठ्या नुकसानीस आपण जबाबदार आहोत. निसर्गाचा अभ्यास, निसर्ग सानिध्य व निसर्गातील बदलांची, हालचालींची सतत निरीक्षणे व भूगर्भातील सूक्ष्म हालचालींची नोंद या निकषांव्दारे भूकंपाच्या संवेदना केदारी यांना आजही जाणवतात. त्यांनी याबाबत अनेक शास्त्रज्ञ, राजकीय नेते, प्रशासकीय अधिकारी यांना भेटून प्रत्यक्ष चर्चा करून याबाबत जागरुक करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याची अद्याप कोणीही गंभीरपणे दखल घेतली नाही, याची खंत केदारी हे नेहमी व्यक्त करतात. भूकंप, त्सुनामी, ग्लोबल वार्मिंग, वादळे अशा विनाशी आपत्तीच्या संदर्भातील उपाययोजनांसाठी आणि त्यातील लोकसहभागासाठी केदारी यांचे प्रयत्न मार्गी लागावेत, हीच अपेक्षा.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर