शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

आधी मुलीवर अत्याचार नंतर तिच्या पित्यालाही केले ठार; शेवगाव तालुक्यातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2020 19:38 IST

मुलीवर अत्याचार करणा-या नराधमांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याच्या रागातून तिच्या पित्याचीही निर्घृण हत्या केली. शेवगाव तालुक्यातील सोनविहीर येथे शुक्रवारी (दि़.७) सायंकाळी ७ वाजता ही घटना घडली. 

शेवगाव : मुलीवर अत्याचार करणा-या नराधमांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याच्या रागातून तिच्या पित्याचीही निर्घृण हत्या केली. शेवगाव तालुक्यातील सोनविहीर येथे शुक्रवारी (दि़.७) सायंकाळी ७ वाजता ही घटना घडली. याप्रकरणी मयताच्या पत्नीने येथील पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.       शेवगाव तालुक्यातील सोनविहीर येथे राहत असलेल्या शेतमजूर दाम्पत्याची मुलगी काही दिवसांपूर्वी नेवासा तालुक्यातील मोरे चिंचोरा येथे नातेवाईकांकडे गेली होती. तेथे विकास फुलसिंग भोसले याने सदर मुलीशी शारीरिक संबंध ठेवले. ही बाब मुलीच्या पित्याला समजली तेव्हा विकास भोसले, रवी भोसले व त्यांच्या इतर नातेवाईकांविरोधात सोनई पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपींविरोधात कलम ३७६ (अत्याचार) प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. आपल्या विरोधात गुन्हा दाखल केल्याच्या कारणातून विकास भोसले, रवी भोसले व त्यांना मदत करणारा सुरेश पुंजाराम काळे हे पीडित मुलीच्या पित्याशी नेहमी भांडण करीत होते. पंधरा दिवसांपूर्वी विकास व रवी भोसले हे सोनविहीर येथे सुरेश काळे याच्या घरी येऊन राहत होते़. विकास हा ‘तुझी मुलगी मला देऊन टाका मी तिच्यासोबत लग्न करणार’ असे पीडित मुलीच्या पित्याकडे आग्रह करीत होता. आपल्या मुलीचे त्या आरोपीशी लग्न लावून देण्यास पीडितेच्या माता-पित्यांनी नकार दिला. मुलगी देण्यास नकार दिल्याचा राग आरोपींना होता. शुक्रवारी सायंकाळी पीडित मुलीचे माता-पिता त्यांच्या सोनविहीर येथील घरी जेवन करत होते. याचवेळी सुरेश काळे, रवी भोसले व विकास भोसले यांनी कु-हाड, चाकू व बांबूने पीडित मुलीच्या पित्यावर हल्ला केला. यावेळी जखमी झालेल्या मुलीच्या पित्याने स्वत:ला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र तिघा आरोपींनी त्यांच्या अंगावर जागोजागी वार करून जखमी केले. यावेळी मुलीच्या आईने आरडाओरड केल्यानंतर तिघे मारेकरी पळून गेले. जखमीला शेवगाव येथे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. या गुन्ह्यातील आरोपीच्या शोधासाठी विविध ठिकाणी पथक रवाना करण्यात आले. असल्याचे शेवगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक रामराव ढिकले यांनी सांगितले. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरCrime Newsगुन्हेगारीShegaonशेगाव