ज्यांना ई-पास हवा आहे त्यांनी http://covid19.mhpolice.in या वेबसाईटवर जाऊन स्वतःची माहिती फोटो व ज्या कामासाठी घराच्या बाहेर जायचे आहे त्या कारणाशी संबंधित असलेले कागदपत्र अपलोड करणे आवश्यक आहे. ही माहिती व कागदपत्रे अपलोड केल्यानंतर संबंधितांना एक सांकेतिक क्रमांक मिळणार आहे. तो सांकेतिक क्रमांक पुन्हा वेबसाईटवर टाकल्यानंतर हा ई-पास थेट डाऊनलोड करून घेता येईल. अर्जदाराला २४ तासाच्या आत अशा स्वरूपाचे पास मिळणार आहेत. दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून तसेच विनाकारण फिरणाऱ्यांना चाप बसावा, यासाठी पोलीस प्रशासनाने ई-पास सक्तीचा केला आहे. वैद्यकीय कारण इतर अत्यावश्यक सेवा, अंत्यविधी आदी महत्त्वाच्या कामासाठीच हा पास दिला जाणार आहे.
...........
दोन दिवसात २५० अर्ज
घराबाहेर जाण्यासाठी शासनाने पास सक्तीचा केल्याने गेल्या दोन दिवसात पोलीस प्रशासनाकडे २५० अर्ज आले आहेत. लोकांची गैरसोय होऊ नये यासाठी तातडीने हे पास दिले जाणार असल्याचे सायबर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक प्रतीक कोळी यांनी सांगितले.