शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

नगरमधून बाहेर जाणा-या २२ हजार जणांचे ई-पास ‘रिजेक्ट’; अडीच हजार प्रलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2020 11:59 IST

लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या स्थलांतरित मजूर, पर्यटक, भाविक, विद्यार्थी व इतर व्यक्तींना त्यांच्या वास्तव्याच्या मूळ ठिकाणी परतण्यासाठी अहमदनगर जिल्ह्यातून गेल्या पंधरा दिवसात तब्बल ४० हजार आॅनलाईन अर्ज प्राप्त झाले. मात्र कारण असमाधानकारक असल्याने त्यातील २२ हजारांहून अधिक ई-पास नाकारण्यात आले.

अहमदनगर : लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या स्थलांतरित मजूर, पर्यटक, भाविक, विद्यार्थी व इतर व्यक्तींना त्यांच्या वास्तव्याच्या मूळ ठिकाणी परतण्यासाठी अहमदनगर जिल्ह्यातून गेल्या पंधरा दिवसात तब्बल ४० हजार आॅनलाईन अर्ज प्राप्त झाले. मात्र कारण असमाधानकारक असल्याने त्यातील २२ हजारांहून अधिक ई-पास नाकारण्यात आले. १६ हजार ४०० अर्ज मंजूर झाले, तर अद्याप अडीच हजार अर्ज प्रलंबित आहेत.लॉकडाऊनमुळे अनेक मजूर, पर्यटक, विद्यार्थी, भाविक इतर राज्यात, जिल्ह्यात अडकून पडले. त्यांना आपल्या मूळ गावी जाण्यासाठी केंद्र सरकारने १ मे पासून सवलत दिलेली आहे. मात्र त्यासाठी त्यांना ‘कोविड १९ डॉट एमएचपोलीस डॉट ईन’ या संकेतस्थळावर आॅनलाईन पाससाठी माहिती भरण्यास सांगण्यात आले आहे. नगर जिल्ह्यासाठी प्रथम हे काम पोलीस अधीक्षक कार्यालयात सुरू होते. परंतु नंतरच्या काही दिवसांत ते महसूलकडे आले व सध्या महसूल विभागामार्फतच सुरू आहे. उपजिल्हाधिकारी उदय किसवे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार (कूळकायदा) शरद घोरपडे व त्यांचे पथक ई-पासची प्रक्रिया हाताळत आहेत. प्रारंभी अत्यावश्यक सेवेसाठी असणारे हे पास आता इतर कारणांसाठीही दिले जात आहेत. त्यातील अटी काहीशा शिथिल केल्या आहेत. परंतु तरीही अर्ज रिजेक्टचे प्रमाण अर्ज मंजुरीपेक्षा जास्त आहे. त्यामुळे अनेकांना इच्छितस्थळी जाणे अवघड झाले आहे. ज्याला प्रवास करायचा आहे, त्याचा पासपोर्ट फोटो संकेतस्थळावर अपलोड करावा लागतो. या फोटोचा आकार २०० केबीपेक्षा जास्त नसावा असे म्हटले आहे. शिवाय वैद्यकीय प्रमाणपत्र व आधारकार्ड अशी कागदपत्रे जोडायची असून त्याचाही आकार ५०० केबीपेक्षा जास्त नसल्याचे म्हटले आहे. परंतु अनेकजण हा अर्ज मोबाईलवर भरतात. त्यामुळे या कागदपत्रांचा आकार कमी करता येत नाही. त्यामुळेही अर्ज भरण्यात अडचणी येत आहेत. का होतात अर्ज ‘रिजेक्ट’या आॅनलाईन पाससाठी तुम्हाला कोणत्या जिल्ह्यात प्रवास करायचा आहे, प्रवासाचा कालावधी, प्रवासासाठीचे वाहन, वैद्यकीय तपासणी प्रमाणपत्र, आधार कार्ड क्रमांक, फोटो आदी माहितीसह सर्वात महत्वाचे म्हणजे प्रवासाचे कारण ही माहिती भरावी लागते. परंतु यातच अनेक अर्ज नाकारले जात आहेत. मूळात हा संपूर्ण अर्ज इंग्रजीत भरायचा आहे. त्यामुळे अनेकांना तो भरता येत नाही. प्रवासाचे कारण अनेकदा वैयक्तिक असे दिले जाते. त्यामुळे ते नाकारले जाते. प्रवास करणारे अनेक व वैद्यकीय अहवाल केवळ एकाचा असे झाल्यानेही अर्ज रिजेक्ट होत आहेत. 

नगर जिल्ह्यात दररोज सुमारे अडीच ते तीन हजार आॅनलाईन अर्ज प्राप्त होतात. त्या सर्वांचा निपटारा करण्याचा प्रयत्न असतो. याशिवाय अर्जाच्या चौकशीसाठी १०० हून अधिक कॉलही येतात. सर्वांची निकड लक्षात घेता अधिकाधिक अर्ज मंजुरीचा प्रयत्न केला जातो, असे तहसीलदार शरद घोरपडे यांनी सांगितले.  

टॅग्स :AhmednagarअहमदनगरCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसonlineऑनलाइन