शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

अण्णांची प्रकृती खालावल्याने राळेगणसिद्धीचे ग्रामस्थ चिंतेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 11:46 IST

गेल्या सात आठ दिवसांपासून राळेगणसिद्धी परिवाराचे डोळे रामलीला मैदान व अण्णांच्या उपोषणाकडे लागले आहेत. आपलं संपूर्ण जीवन समाज व देशहितासाठी समर्पित केलेल्या ८० वर्षांच्या अण्णांच्या मागण्या मान्य होवो न होवो. परंतु, राळेगणसिद्धी परिवाराला अण्णा हवे आहेत.

एकनाथ भालेकरराळेगणसिद्धी : गेल्या सात आठ दिवसांपासून राळेगणसिद्धी परिवाराचे डोळे रामलीला मैदान व अण्णा हजारे यांच्या उपोषणाकडे लागले आहेत. आपलं संपूर्ण जीवन समाज व देशहितासाठी समर्पित केलेल्या ८० वर्षांच्या अण्णांच्या मागण्या मान्य होवो न होवो. परंतु, राळेगणसिद्धी परिवाराला अण्णा हवे आहेत. आपण अण्णांना वाचवलं पाहिजे, असा चिंताक्रांत सूर ग्रामस्थांतून उमटत आहे. रोज होणाऱ्या ग्रामसभांमध्ये अण्णांच्या तब्येतीच्या काळजीने ग्रामस्थांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या.सध्या अण्णांचे वय ८० असल्याने वृद्धापकाळात अण्णांनी उपोषण करू नये असा ग्रामस्थांचा आग्रह होता. परंतु, शेतक-यांचे व लोकपाल-लोकायुक्त नियुक्तीचे प्रश्न महत्वाचे असल्याचे सांगत अण्णांनी २३ मार्चपासून रामलीला मैदानावर उपोषण सुरू केले आहे. अण्णांचे उपोषण लवकर सुटावे यासाठी २३ मार्चपासून राळेगणसिद्धीत रोज आंदोलने व ग्रामसभा सुरू आहेत. सर्वच महिला - पुरूष या आंदोलनात सहभागी होतात.जलसंपदा मंत्री गिरीश महाजन केंद्राचा मसुदा घेऊन अण्णांकडे गेल्यावर ग्रामस्थांना अण्णांचे उपोषण सुटेल अशी आशा मंगळवारी ( दि. २६ ) वाटली होती. परंतु, मागण्या मान्य होत नसल्याने अण्णांनी प्राण असेपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचा निर्धार केला. त्यात त्यांची प्रकृती खालावल्याने डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिल्याने ग्रामस्थांच्या चिंतेत वाढ झाली आहे.अण्णांचे ज्येष्ठ सहकारी सावळेराम पठारे म्हणाले की, अण्णांनी त्यांचा प्रपंच खूप मोठा केला आहे. ते नेहमी देश व समाजाचाच विचार करतात. या मतलबी सरकारला अण्णांची काहीच काळजी नाही. आम्हाला अण्णा पाहिजेत. एक वेळ मागण्या जरी मंजूर झाल्या नाही तरी अण्णांनी राळेगणला यावे. आमच्यासाठी अण्णा देव आहेत. त्यांनी आमच्यासाठी खूप केले आहे. आमच्या गावाला त्यांनी एक ओळख दिली. अण्णांचे बंधू मारूती हजारे म्हणाले, अण्णांचे उपोषण लवकर सुटावे, ही सर्व ग्रामस्थांची इच्छा आहे. सरकारने जर त्यांच्या मागण्या लवकर मान्य केल्या नाही तर त्यांच्या अगोदर मीच माझा प्राण त्याग करील. अण्णा टीव्हीवर दिसत नसल्याने खूप चिंता वाटते. वर्तमानपत्रातच फक्त वाचायला मिळते.टीव्हीवर थोडे फार जरी दिसले तरी समाधान वाटेल. मागण्या जरी मंजूर झाल्या नाहीतरी अण्णांनी आपले उपोषण मागे घेऊन अन्य मार्गांचा अवलंब करून सरकारची कोंडी करावी.

टॅग्स :anna hazareअण्णा हजारेAhmednagarअहमदनगर