शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

दुर्देव : पत्नीचा बाळासह मृत्यू , पतीचाही अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2018 17:56 IST

एक वषापुर्वीच विवाह झालेला. प्रसुती जवळ आल्याने पत्नीला दवाखान्यात दाखल केले. याचदरम्यान अगोदरच एका पायाने अपंग असलेल्या पतीचा अपघात झाला.

मिरी : एक वषापुर्वीच विवाह झालेला. प्रसुती जवळ आल्याने पत्नीला दवाखान्यात दाखल केले. याचदरम्यान अगोदरच एका पायाने अपंग असलेल्या पतीचा अपघात झाला. पतीलाही दवाखान्यात दाखल करण्यात आले. मात्र पत्नीचा उपचारादरम्यान बाळासह दुर्देवी मृत्यू झाला. या घटनेने जामखेडमधील प्रदीप फलके यांच्या कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला.दहा महिन्यांपूर्वी रेणुकाईवाडी(ता.पाथर्डी) येथील कल्याण निंबाळकर यांची एकुलती एक मुलगी सोनाली हिचा विवाह जामखेड येथील प्रदीप फलके यांच्याशी झाला होता. प्रदीप यांचे आईवडील बिकट परिस्थितीमुळे कामानिमित्त परराज्यात स्थायिक झाले होते. नुकतीच सोनाली ही प्रसूतीसाठी माहेरी आली असता तिच्यावर मिरी(ता.पाथर्डी) येथील एका खाजगी रुग्णालयात प्रसूतीपूर्व उपचार सुरू होते. प्रसूतीपुर्वी तीन वेळा करण्यात आलेल्या तपासणीमध्ये कोणत्याही प्रकारच्या त्रुटी आढळून आल्या नव्हत्या. परंतु आठ दिवसांपूर्वी सोनालीला अचानक त्रास होऊ लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले. गुरुवारी सोनालीला अत्यवस्थ वाटू लागल्याने तिची प्रसूती होणे गरजेचे होते. परंतु नैसर्गिक प्रसूती होत नव्हती. सोनालीच्या जीवितास धोका असल्याचे लक्षात आल्याने डॉक्टरांनी तातडीने तिला नगर येथील एका रुग्णालयात हलविण्याचे सुचवले.नातेवाइकांनी नाइलाजाने सोनालीला नगरच्या खाजगी रुग्णालयात दाखल केले. तेथील डॉक्टरांनी तिच्यावर उपचार केले परंतु रुग्णाची परीस्थिती अत्यंत गंभीर असल्याने त्यांनी पुन्हा पुण्याला हलविण्याचा सल्ला दिला. नातेवाइकांनी रूग्णाला रात्री अकराच्या सुमारास पुणे येथील ससून रुग्णालयात दाखल केले. परंतु रक्तदाब कमी असल्याने सोनालीची प्रसुती करणे अशक्य झाल्याने बाळाचा गुदमरून गर्भातच मृत्यू झाला तर सोनाली हिचेही शुक्रवारी पहाटे चारच्या सुमारास निधन झाले. सोनालीचे पती अपघातग्रस्त असल्याने त्यांना वाहनाने ससून रुग्णालयात दाखल केल्यानंतरच रुग्णालयाने मृतदेह ताब्यात दिला. त्यामुळे रात्री उशिरा सोनालीच्या मृतदेहावर तिच्या माहेरी अंत्यसंस्कार करण्यात आले.पतीचेही अपघातात दोन्ही पाय झाले निकामीप्रथमच एका पायाने अपंग असलेले सोनालीचे पती प्रदीप फलके यांचा आठ दिवसांपूर्वीच पावसाच्या पाण्यात घसरून झालेल्या अपघातात दुसरा पाय देखील निकामी झाला होता. अशातच सोनालीचे निधन झाल्याने दोन्ही कुटुंबावर दुखाचा डोंगर उभा राहिला आहे.नगरच्या रुग्णालयाने एका दिवसाचे घेतले चाळीस हजारनगरच्या खाजगी रुग्णालयात सकाळी नऊ ते दुपारी चारपर्यत दाखल केलेल्या रुग्णाचे(सोनाली) बील कोणतीही शस्त्रक्रिया न करता सुमारे चाळीस हजार झाल्याने अशिक्षित व गरीब कुटुंबाची किती पिळवणूक केली जाते याचे चित्र स्पष्ट झाले आहे. पूर्ण बील अदा करेपर्यंत सुमारे चार तास रूग्णाला ताटकळत ठेवल्याने नातेवाइकांनी नाराजी व्यक्त केली.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरNevasaनेवासा