शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

महिला ग्रामसभेत एरंडगावला दारूबंदीचा ठराव 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2019 13:02 IST

गावातील अवैध दारू विक्री, अवैध धंदे बंद करण्याचा ठराव एरंडगाव समसूद (ता. शेवगाव) येथील महिला ग्रामसभेत सवार्नुमते मंजूर करण्यात आला. 

वरूर : महिलांची सुरक्षितता आबाधित राहावी यासाठी गावातील अवैध दारू विक्री, अवैध धंदे बंद करण्याचा ठराव एरंडगाव समसूद (ता. शेवगाव) येथील महिला ग्रामसभेत सवार्नुमते मंजूर करण्यात आला. एरंडगाव समसूद येथे गटविकास अधिकारी सुधाकर मुंडे, पोलीस निरीक्षक रामराव ढिकले व विस्तार अधिकारी मल्हारी इसरवाडे यांच्या उपस्थितीत व सरपंच संतोष धस यांच्या अध्यक्षतेखाली महिला ग्रामसभा पार पडली. यावेळी अनेक महिलांनी अवैध दारू विक्रीमुळे महिला व शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनींची सुरक्षितता धोक्यात आल्याचे सांगितले. दारू पिऊन धिंगाणा घालणाºया व्यक्तींमुळे आम्हाला घराबाहेर पडणेही मुश्किल होते. गावात शांतता आहे. तरीही काही विघ्नसंतोषी व समाज कंटकांकडून वाईट बुद्धीने प्रेरित होऊन शांतता व जातीय सलोखा बाधित केला जातो, अशा शब्दांत महिलांनी व्यथा मांडल्या. त्यानंतर अवैध दारू विक्री व अवैध धंदे बंद करण्याचा व संबधितांवर कारवाई करण्याच्या मागणीचा ठराव सवार्नुमते मंजूर करण्यात आला. ग्रेसबाई योसेफ गजभीव यांनी हा ठराव मांडला. त्यावर शिलाबाई रामदास जगधने यांनी अनुमोदन दिले. ग्रामसेविका आर. बी. झिरपे यांच्यासह माजी सरपंच, विविध संस्थांचे पदाधिकारी, ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, युवक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. ठरावाची प्रत जिल्हा पोलीस अधिक्षक इशू सिंधू यांनाही पाठविण्यात आल्याचे सरपंच संतोष धस यांनी सांगितले.

टॅग्स :Shevgaonशेवगाव